रस्ते कंत्राटदारावर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन – मनसे चा सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्वाणीचा इशारा.
हुडकेश्वर रस्ता व त्यावर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे रेंगाळलेले काम तात्काळ पूर्ण करून दिरंगाईबद्दल कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका अश्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण विभाग अध्यक्ष श्री. अंकित झाडे यांच्या नेतृत्वात शहर अध्यक्ष श्री विशाल बडगे व श्री चंदू लाडे, शहर सचिव श्री. महेश जोशी, श्री. घनश्याम नीखाडे व श्री. रजनीकांत जिचकार यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. सुनील शेंडे यांना देण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभाग (ग्रामीण) अंतर्गत हुडकेश्र्वर रस्त्याचे काम सुरू असून सदर काम गेल्या कित्येक महिन्यांपासून रेंगाळले असून विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे असे स्पष्ट करून विभागाची कृपादृष्टी व राजकीय पाठबळामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग कंत्राटदारावर कारवाई करायला कचरत आहे असा स्पष्ट आरोप मनसे शिष्ठ मंडळाने चर्चे दरम्यान केला. रस्त्याच्या दिरंगाईमुळे वस्तीत वारंवार अपघात होत असून अश्या जीवित हानीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल मनसे पदाधिकाऱ्यांनी केला. कामात सुरू असलेल्या दिरंगाईचा विचार करता अश्या मग्रूर कांत्रादराला काळ्या यादीत टाकून अर्धवट राहिलेले काम त्याच्या सुरक्षा रकमेतून दुसऱ्या कंत्राटदाराद्वारे पूर्ण करण्याची तसेच संबंधित रस्ते ठेकेदाराकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील उर्वरित सगळी कामे काढून घेण्याची मागणी मनसे शिष्ठ मंडळाने केली. कामाच्या निकृष्ठ बांधकामाबाबत चर्चे दरम्यान उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण कामाची त्रयस्थ सौंस्थेमार्फत चौकशी करून कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली. जनतेचे हित विचारत घेवून कोणत्याही राजकीय दबावात न येता कंत्राटदारावर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई अपेक्षित असून तसे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना वसाहतीतील जनतेच्या सहकार्याने व सहभागाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वस्वी जवाबदार राहिलं ही स्पष्ट जाणीव उपस्थित अधिकाऱ्यांना करून देण्यात आली.
सदर रस्त्याची उर्वरित पूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून जनतेला होत असलेल्या मानसिक व शारीरिक त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी करण्यात आली. याबाबत विभागाद्वारे लेखी उत्तर मागून आजपर्यंत विभागाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर कागदोपत्री अहवाल देण्याबाबत विभागीय अभियंता श्री. सुनील शेंडे यांच्याकडे मागणी करण्यात आली.
दक्षिण नागपूर विभाग अध्यक्ष श्री. अंकित झाडे यांच्या नेतृत्वात तसेच शहर अध्यक्ष श्री. विशाल बडगे व श्री. चंदू लाडे, शहर सचिव श्री. महेश जोशी, श्री. घनश्याम नीखाडे व श्री. रजनीकांत जिचकार यांच्या उपस्थितीत देण्यात आलेले निवेदन व त्यावर झालेल्या चर्चेत पूर्व नागपूर विभाग अध्यक्ष श्री. उमेश उतखेडे, मा. महिला पदाधिकारी सौ. मनिषाताई पापडकर व सौ. मंजुषा पानबुडे, लोकेश कामडी, नितीन बोभाटे, सौरभ पोचनपल्लीवर, शुभम तीरगुळे, निकेश अतकरी, राज आंभोरे, यश कडू, गौरव आंबेकर, आकाश नागपुरे, पंकज रिठे, आदित्य भोयर, मयुर राऊत व मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.