पत्रलेखन पुरस्काराची रक्कम राज्यपालांकडून पोस्टातील करोना बाधितांसाठी
टपाल विभागातर्फे आयोजित केलेल्या पत्रलेखन स्पर्धेत पुरस्कार रूपाने प्राप्त झालेल्या ₹२५००० रकमेत, स्वतःच्या वेतनातून आणखी ₹२५००० जोडत एकुण रक्कम टपाल विभातील करोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारांसाठी टपाल विभागाला देणार असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जाहीर केले.
महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती निमित्त टपाल विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने ‘ढाई आखर’ स्पर्धेत “प्रिय बापू आप अमर है” या विषयावर ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत आंतर्देशीय पत्रलेखन गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक राज्यपाल कोश्यारी यांना प्राप्त झाले होते. पोस्ट खात्याचे अधिका-यांनुसार स्पर्धेत ८०००० पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता.
मागील वर्षी टपाल खात्यातर्फे दुर्लभ टिकिटांचे प्रदर्शन उद्घाटनवेळीच त्यांनी या पत्रलिखान स्पर्धेचे आयोजनास्तव टपाल विभागाचे कौतुक केले होते व यात सहभागाचेही जाहिर केले होते, त्यानुसार आंतर्देशीय पत्रावर महात्मा गांधी यांचे जिवन विषयक निबंध लिहून पाठवला होता.