संत हजरत बाबा ताजुद्दीन यांचा वार्षिक उर्स यावेळी साधेपणाने होणार
नागपूर: सर्व देशभर प्रसिद्ध असलेलं संत हजरत बाबा ताजुद्दीन यांचं समाधीस्थळ नागपूरातील ताजबाग येथे देशभरातला मोठा उर्स भरविला जात असतो. मात्र यंदा कोरोनाव्हायरस प्रकोपामुळे जमावबंदीमुळे नियंत्रित राखता यावे यासाठी सरकारच्या कोरोना विषयक गाईडलाईन अनुषंगाने हा वार्षिक उर्स मर्यादित प्रमाणात औपचारिक रीत्या साजरा करण्यात येणार आहे, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टने सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून हा कार्यक्रम औपचारिक कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर्षी दर्गा आवारात भाविकांना प्रवेश मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ताजुद्दीन बाबांच्या या वार्षिक उर्समधे मुंबई मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, काश्मीर, बिहार, असे संपूर्ण देशभरातील भाविकच, नन्हे तर परदेशातूनही भक्त येतात. ताजुद्दिन बाबा यांचा हा 98 वा वार्षिक उर्स 11 सप्टेंबर पासून 18 सप्टेंबर या दरम्यान होईल.