मोठ्या फटाक्यांवर बंदीने शहरातले विक्रेत्यांस लाखोंचा फटका
नागपूर: दिवाळीपुर्व काही दिवसांआधीच जाहीर आयुक्तांचे आदेशाने लहान मोठ्या सर्वच फटाके विक्रेत्यांना गंभीर पेचात टाकले आहे. फटाके व्यापारी वर्षभरापासून या विक्रीसाठी उत्सुकतेने दिवाळीची वाट पाहत असतात, पण आता कोरोना संसर्गाच्या सावटाने यावर कडक निर्बंध लावले गेलेयत व आधीच कोरोनाकाळ व त्यायोगे निर्मीत निराशादायी व्यवसायाने तर या व्यापा-यांचे कंबरडेच मोडले आहे.
हा आदेश लागू झाल्यानंतर गांधीबाग फटाका व्यापारी संघ व यशवंत स्टेडियम मार्केट येथील होलसेल व किरकोळ फटाके विक्रेत्यांत तिव्र नाराजी पसरली आहे. त्यांचे म्हणणे आहे की हा व्यवसाय फार परवानग्या व नियम सांभाळत केल्या जातो, अनेक दूरवरच्या शहरांतून माल आणला, सगळे सोपस्कार पुर्ण करत आता या अंतिम क्षणी विक्रीपासून वंचित करून प्रशासनाने त्यांना लाखो रुपयांचे नुकसान करवले आहे.
विक्रेता सांगतात की आता हा जो आदेश शासनाने काढलाय हा आधीच काढला असता तर कुणी लाखो रूपए गुंतवणूक करून माल मिळवण्यात श्रम खर्ची का घातले असते, आता माल खरेदी झाल्यावर शासनाने असा आदेश काढल्याने तो सर्व माल आमच्यामाथी बसतोय, विक्रेतांवर कडक नजर आहे, बंदीचा फटाका आढळला तर जबर दंड आहे अशांत विक्रेता काय करेल? कोरोनामुळे परत सर्वच फटाक्यांचे किंमतीत वाढ आढळते व याकारणाने विक्रीवरही फरक पडलाय, ग्राहक संभ्रमित आहे अशात वेगवेगळ्या बातम्यांमुळे खरेदिसाठी फटकत नाहीत, ग्राहकीच नसल्याने अजून तरी काहिच विक्री नाही येत्या २ दिवसांत जो काय व्हायचा तो व्यवसाय होईल.
विस ते पस्तीस वर्षापासून हा हंगामी व्यवसाय करणारे अनेक विक्रेते आता भविष्यात हा नुकसानीचा व्यवसाय अजिबात करणार नाही असे बोलून दाखवत आहेत.