धोका अद्याप टळला नाही, कोरोना साखळी कमजोर होते आहे मात्र तुटलेली नाही आहे
नागपूर: कोरोनाचा कहर आता जरा कमी होताना दिसत आहे. शनिवारी बाधित रूग्णांची संख्या 627 होती. तसेच मरण पावणारेही फक्त 9 होते. तर जिल्ह्याबाहेरील 8 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यात आतापर्यंत संक्रमित रूग्णांची संख्या 86090 वर पोहोचली आहे. तर एकूण मृत्यू 2767 झाले आहेत. डॉक्टरांच्या अंदाजानुसार रुग्णांची संख्या कमी होत आहे. पण धोका टळलेला अजिबात नाही. पुढील महिन्यापासून थंडी वाढू लागल्यावर कोरोना रूग्णांची संख्या वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे.
शनिवारी 832 रुग्णांना बरे झाल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. यासह, आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या 74717 पर्यंत पोहोचली आहे. 24 तासात जिल्ह्यात 6462 लोकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 2895 अँटीजेन चाचणींचा सर्वाधिक समावेश होता.
आता जिल्ह्यातील रिकवरी प्रमाण वाढून 86.77 टक्के झाले आहे. जो आतापर्यंतचा सर्वोच्च आहे. एकूण 8606 सक्रिय प्रकरणे आहेत. ज्यामध्ये अर्ध्याहून अधिक लोक घरातच विलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत. जरी संक्रमित रूग्ण कमी होत आहेत, परंतु डॉक्टरांचा अंदाज आहे, धोका पूर्णपणे टळलेला नाही. पुढील महिना अधिक थंडीचा येईल. या स्थितीत, सर्दी, पडसे असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे कोरोना रूग्णांची संख्याही पुन्हा एकदा वाढू शकते. म्हणूनच डॉक्टरांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
86090 एकूण संक्रमित.
2767 चा मृत्यू
74717 बरे होऊन घरी
शनिवारी 627 सकारात्मक