कोरोनाने पोलिसाचा मृत्यू झाल्यास कुटुंबास सरकारी घर सोडावे लागणार नाही
मुंबई: कोरोना संसर्गाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दररोज हजारोंना कोरोनाची लागण होते आहे. शेकडो लोक यामुळे मृत्युमुखी गेले आहेत. कर्तव्यावर असणारे पोलिसही मोठ्या संख्येने कोरोनाचे बळी होत आहेत. राज्यात आतापर्यंत 54 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर 4 हजाराहून अधिक कोरोनाच्या पकडीत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने पोलिसांसाठी मोठी घोषणा केलीय. कोरोनामुळे पोलिसांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला सरकारी घर रिकामे करावे लागणार नाही, असे सरकारने म्हटले आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे म्हणण्यानुसार, ज्या पोलिस कर्मचा-याला सरकारी घर मिळाले आहे आणि कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचे कुटुंब निवृत्तीच्या तारखेपर्यंत त्या घरात राहू शकेल. ते म्हणाले, ‘पोलिसांच्या कुटूंबाना घरांची काळजी घेण्याची गरज नाही. सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत कुटुंब सरकारी घरात राहू शकते.
गृहमंत्री म्हणाले की सरकारने मानवता म्हणून हा निर्णय घेतला आहे, ‘पोलिसांच्या बलिदानाच्या बदल्यात आपण किमान हे तरी करू शकतो. महाराष्ट्रात आतापर्यंत 4,326 पोलिसांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यातील 3282 लोक आतापर्यंत बरे झालेत. या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत 54 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात कोविड19 चे 4841 नवीन प्रकरणे नोंदली गेली असून राज्यात एकूण प्रकरणे 1,47,741 पर्यंत वाढली आहेत. त्याचवेळी मृतांची संख्या वाढून 6,931 वर गेली. राज्यात आणखी 192 रुग्ण मरण पावले ज्यामुळे राज्यात मृतांचा आकडा 69 31 पर्यंत वाढला आहे.