कोवॅक्सिन या भारतीय लसीची नागपुरात चाचणी दुस-या टप्प्यात
नागपूर:- कोरोना या महाभयंकर आजाराचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी त्यावर प्रतिबंधक लस संशोधनाचा जगभरात प्रयत्न चालू आहे, भारतातही कोवॅक्सिन ही लस सर्वत्र चाचणीच्या टप्प्यात आली आहे, नागपुरातही तिची प्रथम चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे तर आता दुसऱ्या टप्प्यातील चाचणीही नागपूरात सुरू झाली आहे.
१२ ते ६५ वयोगटातील ५० व्यक्तिंवर ही मानवी चाचणी केली जाणार आहे. यात २२ महिला तर २८ पुरूषांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात २२ व्यक्तींवर ही चाचणी यशस्वीपणे केली गेलीय तर त्याअंतर्गतचे, पश्चातचे निकालही सकारात्मक असे भेटलेले आहेत.
भारत बायोटेक, एन आय सी पुणे व आय सी एम आर यांच्या संयुक्त विद्यमाने कोवॅक्सिन मानवी चाचणीचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झालेला आहे आणि तो यशस्वी होताना दिसत आहे. नागपूरातील सेंटर मध्ये पहिल्याच दिवशी लावण्यात आलेल्या ५० लोकांपैकी सर्वांनाच हा डोस लावल्यानंतर कोणालाही काही त्रास झाला नाही, आता दुस-या डोसची परवानगी शासनाने दिलेली आहे, भारतात ८ सेक्टर मधे ३८० लोकांना हि वॅक्सिन लावली जात आहे, नागपूरात पैकी ५० वर ही चाचणी केली गेली. यात ७ मुलं तर ५५ वयोगटात ८ जेष्ठ नागरिक आहेत, लस टोचणीपश्चात कुणालाच कसल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही तर हा सुरक्षित वाटतो आहे.
दुसऱ्या टप्प्यातील पहिला डोस झाल्यानंतर दुसरा डोस साठी २८ दिवसानंतर सदर नागरिकांस बोलवण्यात येणार आहे, त्यांचे रक्ततपासण्या केल्या जातील, त्यावरून शरिरात उत्पन्न एंटिबॉडीज पाहिल्या जातील व वॅक्सिन ची तिसरी चाचणीस प्रारंभ केला जाईल.
दुस-या फेजप्रमाणेच तृतीय टप्पाही तितकाच कालावधी घेईल तो यशस्वी ठरल्यास जानेवारीत पहिल्या आठवड्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता बळावेल असे केंद्राचे अधिका-यांनी सांगीतले