आधुनिक पद्धतीच्या वापरामुळे महा मेट्रोचे काम सुलभ
नागपूर: दळणवळणाचे मोठे प्रकल्प राबवताना त्यात मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या सोबतच यंत्र-सामुग्रीचा उपयोग देखील तितकाच जास्त होतो. एकूण ८६८० कोटींचा मेट्रो प्रकल्प राबवताना नागपुरात देखील ज्या मोठ्या प्रमाणात मनुष्य बळाचा वापर होतो आहे आणि झाला तसेच अतिशय मोठ्या आणि अवजड यंत्रांचा उपयोग देखील होतो आहे. ही यंत्र सामुग्री अतिशय आधुनिक पद्धतीची असल्याने प्रकल्पाचे काम सुलभ पद्धतीने होत आहे.
महा मेट्रोने प्रकल्पाच्या बांधकामापासून तर रूळ बीछवण्याच्या कामा पर्यंत या विविध यंत्रांचा वापर केला. अश्याच यंत्रांपैकी एक महत्वाचे यंत्र म्हणजे – फ्लॅश बट वेल्डिंग (एफबिडब्ल्यू) मशीन. रुळांचे वेल्डिंग करण्याकरता या मशीनचा वापर झाला. या यंत्राच्या माध्यमाने रिच-१ आणि रिच-३ मध्ये रुळांच्या वेल्डिंगचे काम या आधीच पूर्ण झाले तर उर्वरित म्हणजे रिच-२ आणि रिच-४ मध्ये हेच कार्य नुकतेच पूर्ण झाले.
रुळाचे वेल्डिंग दोन प्रकारे केले जाते – पहिला प्रकारे म्हणजे आधी लिहिल्या प्रमाणे फ्लॅश बट वेल्डिंग’ तर दुसरा प्रकार म्हणजे अल्युमिनो थर्मिट वेल्डिंग’. या पैकी फ्लॅश बट वेल्डिंग हे जास्त मजबूत स्वरूपाचे वेल्डिंग असल्याने महा मेट्रोच्या कामात याचा वापर केला जातो. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पात वापरलेल्या रुळांची लांबी १८ ते २५ मीटर आहे. या रुळांचे वेल्डिंग करून सरासरी ३५० मीटर लांब रुळांचे पॅनल तयार केले जाते.
नागपूर मेट्रो प्रकल्पात सर्वात लांब असे ६०० मीटर लांब रुळांचे पॅनल तयार केले त्यात २५ मीटर लांबीचे २४ भागांचा समावेश आहे. रिच-२ आणि रिच-४ अंतर्गत एकूण ३,०६४ ठिकाणी फ्लॅश बट वेल्डिंग केले असून एकूण नागपूर मेट्रो रेल प्रकल्पांतर्गत आता १०० टक्के फ्लॅश बट वेल्डिंग झाले आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या उभारणीत मनुष्यबळाप्रमाणेच यंत्रांची मोठी भूमिका नेहमी राहिली आहे