शहरातील ८ जलकुंभांचा पाणीपुरवठा शनिवारी राहील बाधित….
नागपूर, जानेवारी 25, 2023: महावितरण (MSEDCL) यांनी 33 KV गोधनी फिडर जी १३२ के वी मानकापूर अप्पर सब स्टेशन वरून येते त्यावर काही देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी , २८ जानेवारी (शनिवार) रोजी ६ तासांचे (सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत) शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. महावितरण च्या ह्या ६ तासाच्या शटडाऊन मुळे नागपूर महानगरपालिका आणि OCW चे गोधनी पेंच- ४ हे जलशुद्धीकरण केंद्रावरून पम्पिंग देखील शनिवारी , २८ जानेवारी , रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत बंद राहणार आहे.
त्यामुळे शहरातीतलं ८ जलकुंभांचा.. नारा जलकुंभ, नारी/ जरीपटका जलकुंभ (आशी नगर झोन), धंतोली जलकुंभ (धरमपेठ झोन), लक्ष्मी नगर जलकुंभ (लक्ष्मी नगर झोन), नालंदा नगर, श्री नगर, ओंकार नगर १ आणि २ जलकुंभ , म्हाळगी नगर जलकुंभ (हनुमान नगर झोन) पाणीपुरवठा , २८ जानेवारी (शनिवार) रोजी बाधित राहील.
पाणीपुरवठा दि २९ जानेवारी ला त्या त्या भागातील वेळापत्रकानुसार सुरळीत होईल.
ह्या महावितरण शटडाऊन कालावधी दरम्यान आणि नंतर देखील बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे…