NMC
प्रतिबंधीत क्षेत्रात मांसविक्रीला बंदी नाही
नागपूर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री. दयाशंकर तिवारी यांच्या वतीने बुधवारी १० जून ला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आरोप लावण्यात आले आहे की मोमिनपुरा कंटेनमेंट झोन मध्ये मांसविक्री कशी काय सुरु आहे व सदर विक्री ही महानगरपालिकेचे प्रयत्नातुन उपलब्ध करुन देण्यात आली आहे तसेच सदर कत्तलखाना महानगरपालिकेने कसा काय सुरु ठेवला व याबाबत मनपा आयुक्त यांनी माफी मागावी.
या अनुषंगाने खुलासा करण्यात येतो की, शासनाचे निर्देशानुसार कंटेनमेंट झोन मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेबाबत मनाई केलेली नाही व महाराष्ट्र शासनाचे दि. १७/०४/२०२० चे आदेशामध्ये मास, मासोळी इ. बाबींची अनुज्ञेयता करण्यात आल्याबाबत स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनावर लावलेले विषयांकीत आरोप तथ्यहीन आहेत.