तिस-यांदा टोळधाड, रामटेकमध्ये ड्रोनमधून कीटकनाशक फवारणी
नागपूर:- कोरोना साथ, लॉकडाऊनमुळे मंदी, यादरम्यानच शेतकर्यांना टोळधाड रूपात आणखी नवी समस्या उभी आहे, मध्यप्रदेशातील पिकांचे नुकसानीनंतर तिस-यांदा टोळांनी नागपूरच्या रामटेक मनसर भागात काल हल्ला केला. आठवडाभरापुर्वी मध्य प्रदेशातील पिपरियामार्गे नागपूरच्या पवनी परिसरात आढळलेल्या टोळांनी आज रामटेक तालुक्यात प्रवेश केला. रामटेकच्या अजनी भागात कृषी विभागाने टोळांवर ड्रोनने कीटकनाशकाची फवारणीही केली.
नागपूरचे कृषी अधिकारींचे मते रामटेक येथे यांचा नमुना घेतला गेला, अग्निशमन दल पोहोचत नाही तेथे ड्रोन वापरून फवारणी करतात पण लगेच त्याचा परिणाम दिसून येत नाही.
25 मे रोजी टोळधाड प्रथम नागपुर जिल्ह्यात आली दोनच दिवसानंतर पुन्हा आढळली तर 8 दिवसानंतर तिसरा हमला पुन्हा झाला. हवेच्या प्रवाहावर यांचा प्रवास अवलंबून असतो, मौदा येथे कृषी विभाग त्यांचा मागोवा घेत आहे, तरी कृषी विभागाने शेतक-यांना सतर्क रहाण्याचे आवाहन केले आहे.