लॉकडाऊन काळातील सेवेची हि पावती: माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते फडणवीस यांची बिहार विजयावर प्रतिक्रिया
नागपूर: माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणूक निकालानंतर ची आपली प्रतिक्रिया माध्यमांना आज दिली. बिहार राज्यात भाजपा मित्र पक्षांना मिळालेल्या यशाबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्ष कार्यकर्ते व पदाधिका-यांचे अभिनंदन केले आहे. हा विजय म्हणजे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने केलेल्या विश्वासाचा विजय असल्याची प्रतिक्रिया श्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
बिहार राज्य निवडणूकीत प्रभारी म्हणून आपली चुणूक दाखवत विजय मिळवून देणा-या फडणवीसांनी आधी देशातील व बिहार राज्यातील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले. हा विजय प्रधानमंत्री मोदीजीवर असलेल्या जनतेच्या विश्वासाची लाट असल्याचे ते म्हणाले.
लॉकडाउन काळातील कठिण परिस्थितित ज्याप्रकारे प्रधानमंत्र्यांचे मार्गदर्शनात लोकांकरिता विभिन्न कामे होत होती, गरीबांसाठी विवीध सेवायोजना राबवल्या गेल्यां ज्यामुळ कोणी उपाशीपोटी नसावा, ह्याच ध्येयाने ते काम करत होते, आज हाच कळवळा व विश्वास जनतेने सार्थ करून दाखवला.
यासाठी पंतप्रधानांचे अतिव आभार, बिहारातील जनतेचेही लक्षावधी आभार तसेच या निवडणूकीत जोमदारपणे प्रचार प्रसारात उतरलेले आपले गृहमंत्री अमितजी शाह, राष्ट्रिय पक्षप्रमुख जगतप्रकाश नड्डा यांचे नेतृत्व व दिशादर्शनास्तव आभार व्यक्त केले.