कोवीड पेशंटवर उपचार करा अन्यथा परवाना रद्द: शहरातल्या ६२७ खाजगी हॉस्पिटल्सला महापौरांचा अल्टिमेटम
नागपूर: कोरोना प्रसारावर अंकुश लावण्याचे प्रशासनाचे एकापाठोपाठ एक प्रयत्न सध्या तरी अपुरे पडत आहे असेच चित्र आहे, लॉकडाउन लावल्या जाणार नसल्यामुळे नुकतेच महापौरांनी जनतेस स्वयंस्फूर्तपणे जागरूकता राखण्यासंबंधीचे आवाहन केले होते, अनेक व्यापारी संघटना आपल्या परीने प्रतिष्ठाने बंद राखून यात मदत करीत आहे तरिही त्याच धर्तीवर अनेक लोक मात्र या सर्व प्रयत्नांना, उपायांना जुमानत नाहीयत म्हणूनच शहरात मास्क न लावता वावरणाऱ्यांना आता दंड ₹२०० वरून ₹५०० वाढवल्या गेला, पोलिस उपायुक्तांनीही त्यांच्या ताफ्यास वर्दळ व रहदारी नियंत्रणास्तव वाहनतपासणी, तसेच अतिक्रमणासाठी बाजारपेठांत कारवाई सुरू केली आहे, तरीही लोकांत सुधारणा दिसून येत नाही, अशात आरोग्य सुविधांचाही तुटवडा प्रचंड जाणवतो आहे, या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना पेशंट चा आकडा सतत वाढतोच आहे. जिल्ह्यात आज १६६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आज १९५७ नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ५५४३० झाली आहे. आतापर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ४२३३३ झाली आहे. नागपूरात एकूण क्रियाशील रुग्ण ११३४४ असूनपैकी ५७५७ गृह विलगिकरणात आहेत. आजचे दिवसभरात ४८ मृत्यु झाले असून त्यापैकी ६ मृत्यू जिल्ह्याबाहेरचे आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.३७ टक्के असे आहे. लोकांत या महामारी विषयक जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे. प्रशासन या दृष्टीने अनेक अभियान राबवत असले तरी सर्वसामान्यांनी त्यात सहभाग घेणे हे महत्त्वाचे ठरणार आहे,