लसवितरण प्रमुख आव्हान: सूक्ष्म नियोजनासाठी आयुक्तांची अपील
नागपूर:- कोरोना संकटात, आरोग्य विभागाने विविध समस्यांना सामोरे जाताना परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. कोरोना सध्यातरी नियंत्रणात आहे. आता लवकरच लस येण्याची शक्यता बनलेली आहे. लस आल्यानंतर केंद्र सरकारकडून वितरणावर प्राधान्य दिले जाईल. लसीचे वितरण हे एक मोठे आव्हान आहे, म्हणूनच या दृष्टीने सज्ज व्हावे व सूक्ष्म नियोजन करण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केलं. महाल येथील नगर भवन इमारतीत आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. उपमहापौर मनीषा कोठे, वीरेंद्र कुकरेजा, अति. आयुक्त राम जोशी, नरेंद्र बहिरवार, संजय चिलकर, साजिद खान, वैशाली मोहकर, डॉ. विजय जोशी आदी यावेळी उपस्थित होते.
आकडेवारीच्या आधारे वितरण: मनपा आयुक्त म्हणाले की, ही लस उपलब्ध करुन देण्यासाठी खासगी रुग्णालये व डॉक्टरांना त्यांच्या युनिटमध्ये काम करणा-या आरोग्य कर्मचा-यांची माहिती लवकरच मनपाकडे पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनपाला उपलब्ध असलेल्या डेटा बेसच्या आधारे लस वाटप करायची आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर माहितीचे आवाहनही केले.
आयुक्त म्हणाले की जनता आरोग्य विभागाकडे आशावादी नजरेने पाहते आहे. कोरोना कालावधीत निश्चितच या विभागाने केलेले काम कौतुकास्पद आहे. आता केंद्र सरकार कोणत्याही वेळी ही लस लोकांमध्ये उपलब्ध करुन देऊ शकते. आयुक्त म्हणाले की कोरोना संकटात आरोग्याच्या दृष्टीकोनातून अनेक राष्ट्रीय कार्यक्रम राबवता आले नाहीत, तरी त्यासाठी मनपाला निधी प्राप्त झालेला आहे. पुढील तीन महिन्यांत या कार्यक्रमांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महागड्या लसीमुळे कमी पुरवठा: महागड्या लसीमुळे सुरुवातीला पुरवठा कमी होणार असल्याचे ते म्हणाले. या कारणास्तव, केंद्र स्तरावर वितरण करण्यावर प्राधान्य निश्चित केले जात आहे. प्राधान्य निश्चित करण्यासाठी शहरासाठी डेटा बेस तयार करणे आवश्यक आहे. सरकारी रुग्णालये तसेच खासगी रुग्णालये, डॉक्टरांची यादी प्राधान्याने दिली जावी. अशा लोकांची यादी तयार करण्याची गरज आहे.
कोरोना लसीचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कोल्ड स्टोरेज हे देखील एक मोठे आव्हान आहे. ते म्हणाले की नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र लोकसंख्येनुसार पुरेसे नसले तरी शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा देण्यासाठी फुट सोल्जर तयार करण्याचे आव्हानही आहे. हे नियोजन त्वरित पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.