Uncategorized
आकाशवाणी चौकात शोले चित्रपटातल्यासारखी विरूगीरी

नागपूर:- आकाशवाणी चौकात शोले चित्रपटातल्यासारखी विरूगीरी करित एक व्यक्ति आत्महत्येच्या ईराद्याने येथील जिओ सेलफोनच्या उत्तुंग टॉवरवर चढला, तेथून तो उडि मारण्याचे प्रयत्नात होता.
अल्पावधितच पोलिस, अग्निशमन दल व पत्रकारांचाही ताफा घटनास्थळावर पोचला, तोवर बघणा-यांचीही चिक्कार गर्दी जमा झाली. पोलिसांना जमाव व वाहतूकीवर नियंत्रण मिळवावे लागले.
नशिबाने विरूचा रोल करणा-या धर्मेंद्र प्रमाणेच या प्रकरणाचा अंत सुखद झाला, सदर इसमाची वृत्त लिहेपर्यंत ओळख पटू शकली नव्हती तर तो कोणत्या उद्देश्याने वा मागण्यांचे पुर्ततेसाठी या प्रकारास धजावला हे ही समजलेले नाही