एम आय डी सी वाहतूक शाखेत विटॅमिन सी औषध वितरण
नागपूर: कोरोनावायरस संसर्ग काळात असलेल्या लॉकडाउन काळात अविरतपणे कर्तव्य बजावणा-या वाहतूक शाखेतील जवानांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे, अनेक जवान या लढ्यात बाधित झाले, अनेक अद्याप काही रूग्णालयांत उपचार घेत आहेत, याची गंभीर दखल घेत नागपुरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कर्मचा-यांची प्रतिकारक क्षमता वाढावी या हेतुने विटॅमिन सी औषधाचे वितरण केले जावे या सुचना निर्गमीत केल्या तद्नुसार एम आय डी सी वाहतूक परिमंडळ शाखेत आज विटॅमिन सी औषधाचे वितरण निरीक्षक संजय जाधव यांचेहस्ते केले गेले.
यावेळी जाधव म्हणाले, नवे आयुक्त अमितेश कुमार यांनी कार्यभार स्विकारताच पोलिस दलातील वाढत्या मृत्युसंदर्भात पाहनी केली व त्यानुषंगेच्या उपाय योजनांवर भर देण्याच्या सुचना दिल्यायत.
नुकतीच आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस कर्मचा-यांना रूग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत म्हणून तिव्र नाराजी व्यक्त करून याविषयक कारवाई न केल्या गेल्यास मनपा आयुक्तांकडे जाण्याचा मार्ग पत्करत पालिका आरोग्य यंत्रणेस खडसावले होते यावरूनच ते या विषयास किती गंभीरतेने घेत आहे याची जणू झलकच त्यांनी दिली होती, तत्पश्चात प्रशासनासही याची दखल घ्यावी लागली
जाधव सांगतात, आयुक्तांनी दलात असलेले बाधित, संशयीत सर्वच प्रकारच्या कर्मचा-यांवर लक्ष ठेऊन प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्याचे निर्देश दिले, दैनिक व आठवडी अशा मल्टीविटामिन औषधि गोळ्या ठराविक पद्धतीने घेण्यासंबंधीच्या सुचना सर्व कर्मचा-्यांस समजावून व आवश्यकतेने घेण्यासंबंधी माहिती व त्यांचे वितरण त्यानुसार केल्या गेले
विशेष असे की १५ दिवसांचा हा साठा एकत्र खरेदी केला गेलेला आहे व संबंधितचे बिल विभागास दिले गेले आहे. नव्या आयुक्तांनी एखाद्या जबाबदार कुटुंब प्रमुखासारखी भुमिका घेत परिवाराची काळजी वहन करणारं उदाहरण घालून दिलं आहे हे निश्चितच कौतुकास्पद व वेळेची गरज ओळखून घेतलेलं पाऊल आहे
सर्व नागरिकांनीही महामारीच्या या काळात त्यातलं गांभीर्य जसं सुरूवातीच्या काळात जाणत काळजी घेतली तशीच आताही राखावी, हलगर्जीपणा न करता सोशल डिस्टेंसींग, मास्क, इम्युनिटी वाढ, वेळोवेळी ऑक्सीजन पातळी परिक्षण, वाफारा, मल्टीविटामिन औषधं ई बाबी वर विशेष लक्ष द्यावे असे त्यांनी सांगीतले