नेहरू नगर झोन आणि लकडगंज झोन चा पाणीपुरवठा बळकट होणार ..
नागपूर, फेब्रुवारी २१, 2023: नेहरू नगर झोन आणि लकडगंज झोन मधील पाणीपुरवठा बळकटीकरण करण्याच्या हेतूने नागपूर महानगरपालिका आणि OCW यांनी ४.२ कि मी लांबीची ८०० मी मी व्यासाची मोठी जलवाहिनी शताब्दी चौक (रिंग रोड ) ते सक्करदरा जलकुंभ इथपर्यंत नुकतीच टाकली आहे. ह्या जलवाहिनीद्वारे सक्करदरा जलकुंभ आता गोधनी पेंच-४ ह्या जलशुद्धीकरण केंद्राशी डायरेक्ट जोडले जाणार आहे आणि त्यामुळे सक्करदरा १, २, ३ ह्या जलकुंभ अंतर्गत येणाऱ्या नेहरूनगर झोन मधील आणि लकडगंज झोनमधील वस्त्या ह्यांना अधीकचा १७ दश लक्ष लिटर (१७ MLD) पाणीपुरवठा होणार आहे .
ह्या ४.२ कि मी जलवाहिनीचे अंतर्गत स्वच्छता (Flushing) चे काम देखील नुकतेच पूर्ण झालेले आहे आणि येत्या २३ फेब्रुवारी च्या रात्रीपासून ह्या जलवाहिनीला कार्यान्वित करण्याचे कार्य नागपूर महानगरपालिका आणि OCW ने करण्याचे ठरविले आहे. आतापर्यंत सक्करदरा १, २ आणि ३ हे जलकुंभ कन्हान जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा घेत होते, आणि नुकतीच ह्या नवीन जलवाहिनीची आंतरजोडणी करण्यात आलेली आहे ..हे उल्लेखनीय.
ह्या कामामुळे गोधनी पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्रावर आधारित नागपूर शहरातील इतर जलकुंभांचा.. जसे नारा जलकुंभ, नारी/ जरीपटका जलकुंभ (आशी नगर झोन), धंतोली जलकुंभ (धरमपेठ झोन), लक्ष्मी नगर जलकुंभ (लक्ष्मी नगर झोन), नालंदा नगर, श्री नगर, ओंकार नगर १ आणि २ जलकुंभ , म्हाळगी नगर जलकुंभ (हनुमान नगर झोन), हुडकेश्वर आणि नरसाळा ग्रामीण चा पाणीपुरवठा २३ फेब्रुवारी च्या रात्रीनंतर पुढील काही दिवस थोडा बाधित (कमी दाबाने किंवा मर्यादित) राहण्याची शक्यता आहे . पाणीपुरवठा ५/६ दिवसानंतर त्या ..त्या ..जलकुंभ भागातील वेळापत्रकानुसार सुरळीत होईल.
नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी पाणीपुरवठा बळकटी करण करण्याच्या ह्या कामादरम्यान सहकार्य करावे..
अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -OCW च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात .