पाईपलाईन सुधारणेसाठी 12 तास खंडित होईल धरमपेठ, लक्ष्मीनगर झोनचा पाणीपुरवठा
नागपूर: लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 500 मिमी फीडर लाईनवरील खामला चौकात व 450 मिमी फीडर लाईन रामनगर चौकात असलेल्या बाजिप्रभू स्मारका जवळ मोठ्या गळतीची माहिती समोर आली. पाण्याचा हा अपव्यय रोखण्यासाठी येत्या शनिवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत मनपा आणि ओसीडब्ल्यू कंपनीच्या वतीने काम करण्याचे ठरले आहे. त्यामुळे शनिवारी लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रताप नगर टाकी, खामला टाकी व धरमपेठ झोन अंतर्गत रामनगर टाकीचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होईल. म्हणून, त्यावर अवलंबून असलेल्या वस्त्यांच्या पाणीपुरवठ्या चे बाधेविषयीची माहिती ओसीडब्ल्यूद्वारे सांगीतली गेली गेली.
या भागांत होणार नाही पाणीपुरवठा: प्रतापनगर टाकीः सिंधी कालोनी, व्यंक्टेश नगर, कोतवाल नगर, मिलिंद नगर, हावरे लेआऊट, रवींद्र नगर, टेलिकॉम नगर, पूनम विहार, दीनदयाल नगर, सरस्वती विहार, लोकसेवा नगर, सरोदे नगर, खामला पुरानी बस्ती
खामला टाकी : पुराने व नए स्नेह नगर, पांडे लेआऊट, मालवीय नगर, जयप्रकाश नगर, सीता नगर, राजीव नगर, सोमलवाडा, पायोनिअर सोसायटी, पावनभूमी, उज्ज्वल नगर, बांते लेआऊट, इंजीनियरिंग सोसायटी, छत्रपति नगर, कॉस्मोपोलीटन सोसायटी, कर्वे नगर, सावित्री विहार
रामनगर टाकी : हिल रोड, गांधी नगर, शंकर नगर, कोर्पोरेशन कॉलोनी, दंडीगे लेआऊट, त्रिकोणी पार्क, धरमपेठ एक्स्टेंशन, धरमपेठ सीमेंट रोड, डागा लेआऊट, माता मंदिर रोड, भागवाघर लेआऊट, शिवाजी नगर, खरे टाऊन.