कोण किती पाण्यात? पावसाळ्यापूर्वी नागपूरचा जलसाठा

नागपूर:- गतवर्षी कोरडीठाक पडलेली तोतलाडोह व नवेगाव खैरी जलाशयात सद्य  इतके पाणी आहे की पाऊस पडला नाही तरी दोन वर्ष शहराची गरज सहजतेने शमवू शकेल. रविवारपर्यंत तोतलाडोह जलाशयात 9 749.67 टीएमसी म्हणजेच. 73.72 टक्के आणि नवेगाव खैरीमध्ये 115.71 टीएमसी किंवा 81.50 टक्के जलसंचय आहे. तोतलाडोह व नवेगाव जलाशय मागील वर्षी याच तारखेला शून्य साठा होता. जवळपास 15 वर्षांनंतर, शहराला डेड स्टोरेजमधून पाणी घ्यावे लागले.

मात्र यावेळी परिस्थिती समाधानकारक आहे. तोतलाडोहसह नागपूर विभागातील अन्य 17 मोठ्या जलाशयांमध्येही पुरेसे पाणी आहे. 18 प्रमुख जलाशयांमध्ये सध्याची स्थिती 1480.17 टीएमसी म्हणजेच 41.66 टक्के पाणी आहे.

मागील वर्ष नागपूर शहरासाठी सर्वात वाईट होते. उशिरा झालेल्या पावसामुळे शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. तोतलाडोह व नवेगाव खैरीचा साठा मे महिन्यातच संपला. अशा स्थितीत तोलाडोहच्या मृत साठ्यातून पाणी उचलण्यासाठी मनपाला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागली. यानंतर एका दिवसाच्या अंतराने शहराला पाणीपुरवठा करण्यात आला. 15 ऑगस्टपर्यंत शहरात अशीच परिस्थिती होती. मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे 15 ऑगस्ट रोजी चौरई धरणातून पाणी सोडण्यात आले.

यानंतर तोतलाडोहमध्ये पाणी साचू लागले. काही दिवसानंतर महाराष्ट्रातील तोतलाडोह भागातही पाऊस पडला. त्यानंतर तोतलाडोह आणि नवेगाव खैरी धरणाची परिस्थिती समाधानकारक बनली. एक वेळ अशी होती की जेव्हा तोतलाडोह 100 टक्के भरले आणि दारं उघडावे लागले. सध्या भूतकाळातील अनुभव लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने पाणी साठवणुकीसाठी अनेक उपाययोजना सुरू केल्यायत.

Published by

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Exit mobile version