का आणी कसा पसरला सोशल मीडियावर बिनोद उल्लेख असलेल्या फनी मेम्सचा ट्रेंड?
गेल्या काही दिवसांत आपण “बिनोद” उल्लेख असलेल्या बर्याच कमेंट, मेम्स पाहिल्या असतील. अगदी काही ऑफिशियल वेबसाइट व हॅन्डलर्सनेही या “बिनोद” च्या नावाने ट्वीट केलेले आहे, सोशल मीडियावर हा “बिनोद” एक स्पॅमिंग ट्रेंडच बनले आहे. इतकेच नाही तर ट्विटरवर ‘बिनोद’ च्या नावावर मजेदार मेम्स आणि विनोदही बनले आहेत. ट्विटरकर्ते सारेच ‘बिनोद’ ट्रेंड करत आहे, पण हा बिनोद नेमका कोण आहे हे अद्याप ब-्याच लोकांना माहिती नाही. आपणसुद्धा सोशल मिडियावर मेम्सचा महापूर असलेल्या हा “बिनोद” नेमका कोण आहे आणि स्पॅमिंगचा त्याचा काय संबंध आहे हे शोधण्याचा प्रयत्नात असाल तर वृत्त पुर्ण वाचा..
खरंतर, याची सुरूवात स्लेयपॉईंट नावाच्या युट्यूब चॅनलच्या एका व्हिडिओसह झाली. व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट विभागात बिनोद नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या नावानेच कमेंट दिली. बिनोद यांच्या नावाच्या या कमेंटला सात पसंती (लाईक) मिळाले. स्लयपॉईंटने ही कमेंट इतकी ताणली कि या छोट्याश्या गोष्टीमुळे, बिनोदचे नाव इंटरनेटवर ट्रेंड झाले.
विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे, ट्रोल करायचा भाग म्हणून नेटिझन्सने या बिनोदचे नाव टाकून व्हिडिओचे स्पॅमिंग सुरू केले. तत्पश्चात जेव्हा कुठलाही यु ट्यूब लाईव्ह विडियो चालू असेल त्यावर कमेंट विभागात “बिनोद” चा पूर येऊ लागला. तर असा हा बिनोद हा अद्याप अज्ञातच होता ज्याने यूट्यूब व्हिडिओंवर आपले नाव चुकिने कमेंट केले आणि स्पॅमर्ससाठी एका नव्या अस्त्राची सुरूवात झाली.
मग विविध माध्यमांवर ” कौन है बिनोद?” हा ही ट्रेंड सुरू झाला. कालांतराने खरा बिनोद हा बिनोद थारू असल्याचेही कळले पण त्यास काही जास्त प्रसिद्धी मिळाली नाही, मात्र “बिनोद” ट्रेंड ची धाव सुसाट सुरू राहिली.
अल्पावधितच हा बिनोद यु ट्यूब व्यतिरिक्त अन्य माध्यमांवरही ट्रेंड बनला. यु ट्यूब वरून इन्स्टा, मग ट्वीटर फेसबुक असं करत जगभर झाली. आता ट्विटरमध्ये बिनोद अव्वल स्थानी आहे. सोशल मीडिया वापरकर्ते बिनोद वरील मजेदार मेम्स आणि विनोद सातत्याने शेअर करताहेत. त्यामुळे सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल वा ट्रेंड होईल याचा अंदाज कुणालाही करता येणे अवघड आहे हेच सिद्ध होते.