नागपूरात कोरोना रूग्णांस बेड कमी पडणार?
नागपूर:- समर्पित कोविड रुग्णालयांत ३००० पेक्षा जास्त खाटांची क्षमता असूनही, पॉजिटिव्ह रूग्णांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी काही तास अवधि लागत आहेत. असे तर नाही की शहरात रुग्णांसाठी बेड कमतर पडताहेत, परंतु जिल्हा प्रशासनाने बेड क्षमतेच्या जवळपास ५०% चा वापर अद्याप केलाच नाहीय.
कोविड -१९ उपचारासाठी घोषित सुविधांच्या आणि सध्या उपलब्ध असलेल्या विश्लेषणातून असे दिसून आले की ३ कोविड -१९ रुग्णालयांच्या सेवांचा अद्याप वापर झाला नाही.शासकीय मेडिकल हॉस्पिटल, इंदिरा गांधी रूग्णालय आणि एम्स हेच रुग्णांचा संपूर्ण भार सहन करीत आहेत, जो दररोज वाढताच आहे. या हॉस्पिटलमध्ये मिळून सुमारे १२०० बेड आहेत.
पैकी किमान ३५० एकतर आयसीयू किंवा एचडीयू बेड आहेत ज्याचा उपयोग सामान्य रुग्णांसाठी होऊ शकत नाही. या ३ रुग्णालयांव्यतिरिक्त, जिल्हा प्रशासन आणि केंद्राच्या रॅपीड रिस्पॉन्स संघाने (आरआरटी) ३ विश्वस्त-रुग्णालयांमध्ये १३२० बेड असलेल्या कोविड -१९ उपचार सुविधेची पाहणी, मंजूरी आणि नियुक्ती केली होती.
यात ६०० बेड असलेले लता मंगेशकर हॉस्पिटल (एलएमएच), शालिनीताई मेघे मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (६००) आणि सीआरपीएफ हॉस्पिटल (१२०) यांचा समावेश आहे. मात्र सध्या, यापैकी कोणत्याही हॉस्पिटलचा उपयोग केला गेलेला नाही.
आमदार निवासमधील एकमेव कोविड केअर सेंटर (सीसीसी), जेथे निदान झालेल्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत, जवळजवळ पूर्ण भरले आहे. नागपुरातील ८५% पेक्षा जास्त रूग्ण हे लक्षणग्रस्त असल्याचे आढळले आणि त्यांचेवर सीसीसीमध्ये योग्य उपचार केले जातायत. परंतु, प्रशासनाने अद्याप एमएलए निवास सोडून इतर कोणत्याही ठिकाणी या सुविधेचा विकास केलेला नाही.
प्रत्येक तहसील मुख्यालयात सीसीसी घेण्याची योजना अद्याप प्रत्यक्षात आली नाही. जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले की प्रत्येक तहसील मुख्यालयाने सीसीसी सुविधा विकसित केली आहे परंतु रूग्णांना दाखल करण्यासाठी प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. वास्तविक नागपूर ग्रामीणमधील सर्व रुग्ण सध्या शहरातील ३ शासकीय रुग्णालयात दाखल आहेत.
तज्ञांचे मते, जिल्हा प्रशासन एलएमएच आणि शालिनीताई मेघे मेडिकल कॉलेज येथे समर्पित कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची वेळ आली आहे. १३ तहसीलांत विकसित झालेल्या सीसीसी त्वरित सुरू करायला हव्यात आणि महापालिकेने शहरात अधिक सीसीसी विकसित केल्या पाहिजेत.
पालकमंत्री डॉ.नितीन राऊत म्हणाले की, सर्व उपलब्ध व राखीव सुविधांचा वापर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले जातील. आम्ही प्रत्येक रूग्णाला योग्य रूग्णालयात दाखल करण्याची सुविधा मिळवून देऊ आणि बहुतेकांवर सीसीसीमध्ये उपचार केले जातात,
नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूरसारख्या अनेक शहरांत ३००० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. संशयितांनाही घरी विलग ठेवण्याची परवानगी आहे. नागपुरात यापैकी कोणत्याही सेवांना परवानगी नाही.
विशेष म्हणजे २२ जुलै रोजी प्रसिद्ध कोविड -१९ रूग्णांच्या उपचारासाठी अद्ययावत कोविड -१९ ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये असे म्हटले आहे की, विलगीकरणाची सुविधा असल्यास सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर घरी उपचार केले जाऊ शकतात.
या सुधारित धोरणात असेही सूचित केले गेले आहे की सीसीसींनी केवळ ३ लक्षणांनुसार (ए, बी, आणि सी) तीनही गटातील सौम्य रूग्णांवर उपचार केले पाहिजे आणि केवळ मध्यम व गंभीर रूग्णांना समर्पित कोविड रुग्णालयात दाखल करावे.