नागपूर शहर येथे युवासेनेचे सायकल रॅली !
केंद्र सरकारने केलेल्या इंधनवाढ विरोधात आज नागपूर शहर येथे युवासेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या संकटातून बाहेर येण्याच्या प्रयत्नात नागरिक त्रस्त आहेत, परंतु महागाईचे सावट काही डोक्यावरून कमी होत नाही आहे. याच उद्देशाने सामान्य जनतेचा आवाज केंद्र सरकार पर्यंत पोहोचविण्यासाठी युवासेना प्रमुख व पर्यावरण मंत्री मा. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅलीच्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमतीविरोधात आंदोलन करण्यात आले. साध्यच्या काळात पेट्रोल डिझेल इंधन हे जीवनावश्यक वस्तू झालेल्या आहेत. आणि त्यांचे भाव गगनाला भिडले असताना सामान्य नागरिकांचा आवाज केंद्र सरकार ऐकून घेत नाही. या आंदोलनातून केंद्र सरकारला “हेच का अच्छे दिन” हा प्रश्न जाहीरपणे विचारात आहोत. आम्ही आशा करतो की केंद्र सरकार याची लवकरात लवकर दखल घेईल आणि खरच सामान्य नागरिकांसाठी अच्छे दिन येतील.
ही रॅली नागपुर उत्तर पूर्व मध्य या विधानसभा अंतर्गत पुर्व नागपुर टेलीफोन एक्सचेंज चौक भागातील आदम शाह चौक,बडकस चौक,टिळक पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज गांधी गेट (महाल) पर्यंत काढण्यात आली होती आणि युवासैनिक सायकलस्वारांनी भाग घेऊन आपला निदेश दर्शविला.