कोरोना अलर्ट:नागपुरकरांना कोणतीही अड़चण आल्यास करा या नंबरवर फोन

माननीय पंतप्रधानांनी आज रात्री १२ वाजता पासून संपूर्ण देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे.
मी नागपूरचा पालकमंत्री या नात्याने जनतेला आश्वस्त करतो कि, राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आपण घाबरू नका, संयम ठेवा. शांतता बाळगा, शासनाच्या सूचनांचे नियमित पालन करा व आपल्या घरीच रहा.
जीवनावश्यक वस्तू, किराणा, दुध, भाजीपाला, औषधीची दुकाने सुरु राहणार आहेत, वस्तूंचा तुटवडा होणार नाही,याची आम्ही काळजी घेत आहोत, त्यामुळे दुकानात गर्दी करू नका. आपणांस काही अडचण निर्माण झाल्यास, नियंत्रण कक्षात 0712-2567021, 0712-2562668 या क्रमांकावर संपर्क साधावा जेणेकरून आपल्या समस्येचे निरसन करणे सुकर होईल.
कोरोनाबाबत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या सोशल मिडियावरील पोस्ट पासून सावध रहा.
डॉ.नितीन राऊत
ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नागपूर