कोरोना संसर्ग सुरूच: रूग्णांची मालिका लांबतेय
नागपूर:- कोरोनाच्या वाढीचे कारण म्हणजे अधिकाधिक लोक पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात येताहेत. मे महिण्यात पुरेशी दक्षता न बाळगल्यामुळे संक्रमितांची संख्या अचानक वाढली. ही मालिका पुढेही सुरू राहील. परंतु प्रशासनाने संपर्कात आलेल्या 20-दिवसांच्या जुन्या इतिहासाच्या आधारे जास्तीत जास्त लोकांना विलग राखल्यामुळे निरीक्षणाखालील असलेल्यांतच पॉजिटिव्ह आढळत आहेत. हा प्रशासनास काही प्रमाणात दिलासा जरी असला तरी पावसाळ्याचे हंगामात घेतलेल्या निष्काळजीपणा भोवू शकतो. दरम्यान, मंगळवारी 12 रुग्णांमध्ये संसर्गाची पुष्टी झाली. यासह, संख्या आतापर्यंत 1077 वर पोहोचली.
मे अखेरीस आणि जून सुरूवातीस रुग्णांची संख्या वाढली. ईतकेच नाही तर नवनव्या भागात रूग्ण आढळल्याने प्रशासनाला अधिक कसरत करावी लागत आहे. संबंधित जागेस सिल करण्याव्यतिरीक्त पोलिसही तैनात करण्यात आलेत. मंगळवारी आलेल्या अहवालांत भाईपुरा, बजेरिया, हिंगणा अमर नगर, शांतीनगर, इंदोरा, भानखेडा, महाल, चंद्रमणी नगर आणि नाईक तलाव येथील रुग्णांमध्ये संसर्गाची पुष्टी झालीय. वरील सर्व लोकांना वेगवेगळ्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. हे अहवाल आल्यानंतर संपर्कात आलेल्यांची यादी बनवत विलगीकरण केंद्रावर पाठविण्याची प्रक्रिया प्रशासनाद्वारे सुरू झाली. दरम्यान, मंगळवारी एकूण 5 जणांना एम्स आणि मेडिकलमधून सुटी देण्यात आली.
आजपर्यंत शहरात
- एकूण संसर्गीत 1,077.
- मंगळवारी 12 पॉजिटिव्ह
- 17 अद्याप मृत
- 2,328 विलगीकरणात
- 303 गृह विलगीकरणात
- 650 बरे होऊन सुट्टी झाले