COVID-19Nagpur Local
मरकजहून परतलेल्या नागरिकांनी ,जिल्हा प्रशासनास माहिती देणे बंधनकारक
नागपूर दि. 6 : दिल्लीतील मरकजहून परत आलेल्या नागरिकांनी प्रशासनास स्वत:हून माहिती देणे बंधनकारक आहे. अद्याप माहिती न दिलेल्या नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षास संपर्क करावा जे नागरिक स्वत:हून संपर्क करणार नाही अशांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येतील, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज निर्देश दिले.
दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित मरकज संम्मेलनास उपस्थित राहिलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण विभागात विलगीकरण केंद्रामार्फत तपासणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाने पाठविलेल्या यादीनुसार मरकजला उपस्थित राहिलेल्या विभागातील नागरिकांचा शोध घेऊन विलगीकरणात आरोग्य तपासणी सुरु आहे. परंतु अशा नागरिकांनी स्वत:हून जिल्हा नियंत्रण कक्षास माहिती देणे बंधनकारक आहे. ज्यांनी अद्यापपर्यंत माहिती दिली नाही असे प्रशासनाच्या लक्षात आल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संविधान कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही डॉ. संजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
मरकजहून नागपूर येथे परतलेल्या नागरिकांसाठी आमदार निवास, वनामती व रविभवन सुरु करण्यात आलेल्या विलगीकेंद्रात सुविधा करण्यात आली आहे. अशा नागरिकांनी स्वत:हून जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षात माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हानिहाय कोरोना नियंत्रण कक्ष – दूरध्वनी क्रमांक
अ.क्र कार्यालयाचे नाव दूरध्वनी क्रमांक
1 जिल्हाधिकारी, नागपूर 0712-2562668
2 नागपूर महानगर पालिका 0712-2567021
3 जिल्हाधिकारी, वर्धा 07152-243446
4 जिल्हाधिकारी, भंडारा 07184-251222
5 जिल्हाधिकारी, चंद्रपूर 07172-272480
6 जिल्हाधिकारी, गडचिरोली 07132-222031
7 जिल्हाधिकारी, गोंदिया 07182-230196
मरकजहून परत आलेल्या परंतु अद्याप जिल्हा प्रशासनाशी संपर्क न केलेल्या नागरिकांनी तात्काळ नियंत्रण कक्षासोबत संपर्क करून आपली माहिती द्यावी, असे आवाहन डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.