राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहतूक पोलिसांना वापरण्यासाठी जिल्हाधिकारी 200 लीटर हैंड स्यनिटाइजर निःशुल्क उपलब्ध करुन दिल्या.
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहतूक पोलिसांना वापरण्यासाठी जिल्हाधिकारी नरेंद्र ठाकरे सरांचे निर्देशानुसार २०० लिटर हैन्ड स्यानिटायझर १८० मिलीच्या बाटल्या मधून नागपूर डिस्ट्रीलरीच्या माध्यमा तून निःशुल्क उपलब्ध करुन दिल्या.
√ आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई कांतीलाल उमाप यांनी मद्य व्यवसायीकाना ह्यांड स्यानिटायझर निर्मिती बाबत आवाहन केल्या वरुन नागपूर मधील नागपूर डिस्ट्रीलरी, मानस ऍग्रो व रॉयल ड्रिंक्स यांनी ह्यांड स्यानिटायझर उत्पादन सुरु केले आहे. यामध्ये नागपूर डिस्ट्रीलरी यांनी हॉस्पिटलस व पोलीस प्रशासन यांना २० हजार लिटर निःशुल्क देण्याचे नियोजन केले आहे. याबाबत पोलीस आयुक्त डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय सर, पोलीस अधीक्षक ग्रामीण ओला सर तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त मोहन वर्दे सर यांचेशी चर्चा करुन अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी पोलीस विभागा तील त्र्याफिक पोलीस व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना १८० मिलीच्या १००० बाटल्या पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांचे कडे पोलीस उपायुक्त क्राईम गजानन राजमाने यांच्या उपस्थितीत सुपूर्त केल्या.