Informative

लाल पाणी भरून ठेवलेली बाटली पाहून कुत्रे दूर राहतात ? अंधश्रद्धा कि आहे वैज्ञानिक कारण.

सध्या अनेक ठिकाणी भटकी कुत्री आणि त्यांचा त्रास हि मोठी समस्या बनली आहे . परिसरात नवीन , संशयित माणूस दिसला कि हि कुत्री त्याच्यावर धावून जातात . त्यामुळे चोऱ्यामाऱ्या यांपासून संरक्षण मिळते हि गोष्ट खरी असली तरी सामान्यांना याचा त्रास देखील होतो . कुत्रे गाडीच्या मागेही धावल्याने अपघाताच्या घटना बऱ्याच आहेत . त्यात गृहिणींना पडणारी समस्या म्हणजे हि भटकी कुत्री ओल्या कचऱ्याच्या वासाने कचरा उकरतात आणि त्यामुळे अजून दुर्गंधी पसरते . परिणामी कचरा घरात ठेवावा लागतो . अशी तक्रार काही गृहिणी करतात .

Image result for लाल पाणी भरून ठेवलेली बाटली

याता या समस्येवर हा तोडगा कोणी काढला आहे हे माहित नाही . परंतु अनेक वेळा आपण पाहतो कि , लाल रंगाचे पाणी करून ते प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये भरून जिथे कुत्री भटकू नयेत असे वाटते तेथे ठेवली जाते . पुणे , कोल्हापूर वैगरे भागात याचा अधिक उपयोग दिसून येतो . यावर नागरिकांशी चर्चा केली असता , काहींचे म्हणणे आहे कि या बाटल्यांचा काहीही उपयोग होत नाही . तर कुत्री या बाटल्याचं चाटून जातात . तर काहींना मात्र याचा उपयोग होतो असे वाटते . कुत्री या लाल रंगला घाबरून जवळ येणे बंद झाले आहे असे त्यांचे म्हणने आहे . पण असे का होते हे कोणालाही माहित नाही .

Image result for लाल पाणी भरून ठेवलेली बाटली

लाल रंगला खरेच कुत्री घाबरतात का ? हि अंधश्रद्धा आहे कि यामागे काही वैज्ञानिक कारण आहे हे जाणून घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र धर्माधिकारी यांच्या चर्चा केली असता , या मागे कोणतेही शास्त्रीय कारण नसून लाल रंगला कुत्री घाबरतात हे सत्य नाही . परंतु भटक्या कुत्रांना लांब ठेवण्यासाठी या लाल पाण्याच्या बाटल्यांचा काही प्रमाणात उपयोग होतो आहे . असे त्यांनी सांगितले . अर्थातच हि केवळ एक अंधश्रद्धा आहे . आणि यास कोणतेही शास्त्रीय कारण नाही . परंतु तुम्हाला जर भटक्या कुत्र्यांचा त्रास होत असेंन तर लाल रंगाचे पाणी तयार करून बाटलीत भरा. आणि जिथे कुत्री सारखी येतात तिथे ठेवा . या उपाय म्हणजे गाजराची पुंगी वाजली तर वाजली , नाहीतर मोडून खाल्ली असा आहे .

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.