लॉकडाउन चा विषय आता संपला: पालक मंत्री राऊत
नागपूर:- शहरात कोरोना रुग्णांची संख्या पन्नास हजाराच्या वर गेलेली आहे, मृत्यु संख्या दरात कमालीची वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर सर्वत्र पुन्हा लॉकडाउन ची चर्चा होती, सर्वांस प्रशासनाद्वारे पुन्हा कडक लॉकडाउन लावले जाण्याची अपेक्षा होती, पण आठवडाभरात नागपुरात लोक डाऊन केला जाईल की नाही या विषयक घडामोडी पहाता याची शाश्वती कुणालाच नव्हती मात्र आज नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी घोषणा केली आहे की नागपुरात लॉकडाउन होणार नाही.
पालकमंत्री नितीन राऊत यांनी या विषयक बैठकीनंतर आज घोषित केले आहे की नागपुरात लॉकडाऊन होणार नाही, बैठकीत लॉकडाउन विषयक सर्व स्तरावर चर्चा बैठकीमध्ये झाली, जवळपास दोन तास बैठक झाली यातला पहिला महत्वाचा विषय बेडची कमतरता हा होता तद्विषयक उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली तर दुसरा विषय ऑक्सिजनचा सुलभ पुरवठा हा होता तर अन्य विषयांत कॉन्टैक्ट ट्रेसिंग व लॉकडाउन वर चर्चा झाली.
जिल्हा व पोलीस प्रशासन यांना जबाबदारी देत, लोकांमध्ये जागरूकता वाढण्यास प्रयत्नरत रहाण्यावर भर देण्यात येणार आहे. सद्य भितीची परिस्थिति निस्तरण्यावर प्रयत्न व्हायला हवेत कारण अजून या आजारावर कुठली लस आलेली नाही त्यामुळे अद्यापही सामाजिक अंतर, मास्क वापर, इम्युनिटी वाढवने, सॅनिटाईजेशन हेच यावर उपचार आहेत व यावरच भर देऊन काम करावे लागेल.
लॉकडाउन अजिबात करायचं नाही त्याचं कारण असं की ते लावून सामाजिक व आर्थिक प्रेशर वाढेल आणि त्या प्रेशर मध्ये पेशन्टही आणखी मोठ्या प्रमाणात येतीस असं सर्वांचेच याठिकाणी मत मांडलं गेलं आहे. जागतिक परिस्थितितही तज्ञांनी लॉकडाउन हा विषय अव्हेरला आहे. असे त्यांनी सांगीतले.
लॉकडाउन न लादण्याच्या या निर्णयाचे व्यापारी व किरकोळ विक्रेते यांनी स्वागत केले. तर सामान्य नागरिकांनी प्रशासनिक व आरोग्य सुविधांची तत्परता वाढली जावी ही अपेक्षा यावर व्यक्त केली.