InformativeTraffic Updates
वाहतुक पोलीस आता स्विकारणार नाहित चालानची रक्कम! वाचा का बर?
नागपूर: कोरोना विषाणू संक्रमणाचा वाढता फैलाव व प्रभाव लक्षात घेता दैनंदिन कामकाजांत व व्यवहारांत ऑनलाइन देवानघेवान प्रथेची संख्या सर्वत्र वाढली आहे. या संक्रमणात नोटांच्या अदलाबदली मधूनही कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची संभावना बळावली असते यासाठीच नागपूर वाहतूक पोलिसांनीही चालान भरण्याच्या नियमात बदल केला आहे, गेले दोन दिवसांपासून वाहतूक नियम मोडणा-्यांचे चालान ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. या कारणाशिवाय वाहतूक संदर्भात नियम मोडणाऱ्यांना भर रस्त्यावर चलान भरतांना रोख रक्कम घेतानाचे व्हिडिओ खोडसाळपणे चुकीच्या रीतीने मांडून पोलिसांची बदनामी केली जायची त्यामुळे यासंदर्भात यापुढे अशाप्रकारे रोख रक्कमेस जागेवरच भरता येणार नाही तर यासाठी पेटीएम, गुगल पे, या ॲपद्वारे वा नेटबँकिंगने ऑनलाइन पद्धतीने चालान रक्कम भरता येईल अशी माहिती उपआयुक्त विक्रम साळी यांनी दिली
सद्ध्या कोरोना संक्रमणाचा कमाल प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि पोलीस दल विशेषत: याबाबतीत रडारवर आहे, पोलीस दलात बहुसंख्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन झाली आहे, त्यामुळे वाहतूक विभाग दक्षता उपाययोजनांवर विशेष भर देत आहे अशी माहिती उपायुक्तांनी यावेळी दिली.
ते म्हणाले, लोकांच्या सर्वात जास्त संपर्कात वाहतूक विभागच असतो व त्यांचे विशेष डिव्हाइस द्वारे चालान भरण्याची जी पद्धत होती ती बदलण्याचा निर्णय घेतला गेला आहे, चालान केले असलेल्यास ट्रॅफिक विभाग सदर संबंधिची लिंक पाठवेल, त्या लिंक वरूनच त्या चालानची भरपाई करु शकतील अशी व्यवस्था केली गेलेली आहे.
ज्यांच्याकडे ऑनलाइन बँकिंग सुविधा नाही अथवा पेमेंट ॲप्स असलेला एण्ड्रॉईड मोबाईल नाही अश्यांच्या करिता “पेमेंट अनपेड” अशी सुविधाही त्यात ठेवलेली आहे ज्याचे साह्याने सदर ईसम ती रक्कम घरी गेल्यावर अथवा नंतर भरू शकेल त्यासाठीचा कालावधीही निश्चित करण्यात आलेला आहे. अशी माहिती विक्रम साळी यांनी यावेळी दिली.