Nagpur Local
१४ एप्रिल २०२० रोजी कत्तलखाने व मांस विक्री बंद – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त
नागपूर: “डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती” दिनानिमित्त मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२० ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक २/०९/२०१८ रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजूर ठराव क्र.२४० दिनांक ०२/०८/२०१८ चे मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे.
त्यानुसार मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२० ला “डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती” दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हददीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील.
जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कारवाई करण्यात येईल.