नियमित व्यायाम करा- सुनील केदार
कोरोना या महाभयंकर आपत्ती मुळे शासनाने सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन चे आदेश दिले आहे. कोरोना या रोगाने संपुर्ण जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत जगातील कित्येक नागरिक या रोगामुळे मृत्युमुखी पडले आहे. आपल्या देशात ही परिस्थिती न उदभवो या करिता शासनाने लॉकडाऊन या पर्यायाचा उपयोग केला आहे. या मुळे नागरिकांना आपल्या घरीच राहण्याचा आदेश शासनाने दिला आहे.
परंतु नागरिकांनी घरी राहताना सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकरिता सतत प्रयत्न करावे व या करिता नियमित योगा, व्यायाम, दोरीच्या उड्या इत्यादी व्यायाम प्रकार करण्याचे आव्हाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी समस्त जनतेला केले आहे.
आपल्या वक्तव्यात मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की कोरोना हा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणात धोकादायक आहे.त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आपण कोरोना या रोगापासून आपला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचा जीव वाचवू शकतो. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याकरिता नियमित व्यायाम, योगा व दोरीवरच्या उढ्या हे नियमित क्रिया आपण आपल्या घरी करा. व्यायामा व्यतिरिक्त सकस आहार सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याला कारणीभूत आहे. या करिता आपल्या रोजच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन हे केलेच पाहिजे. या मध्ये प्रामुख्याने दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, चिकन,डाळी इत्यादी पदार्थाचे सेवन केले पाहिजे.
जगातीक वैद्यकीय संस्थेने सुद्धा व्यायाम व सकस आहाराने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे स्पष्ट केले आहे. व ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे अश्या व्यक्तींना कोरोना या रोगाचा धोका हा कमी असतो हे सुद्धा जागतिक आरोग्य संस्था (WHO)ने स्पष्ट केले आहे. म्हणून सकस आहार व नियमित व्यायाम करून आपण कोरोनाचा आपल्या देशातून समूळपने हद्दपार करू असा आशावाद मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला