VIKAS MAHATME

कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिला 50 लाखांचा निधी

नागपुर- कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा मिळण्याकरिता राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांनी  50 लाख रूपयांचा निधी नागपुर जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्याची सूचना केली आहे. गुरुवारी त्यांनी नागपूर जिल्हाधिकारी  यांना एक पत्र लिहून कोरोना विषाणूची रोकथाम, प्रतिबंध व उपचार यासाठी वैद्यकीय उपकरणे, टेस्टिंग किट,आरोग्य कर्मिनां लागणारे अत्याधुनिक ड्रेस, मास्क, व सॅनिटायझर्स इत्यादी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध  करुन दिला आहे.खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून हा निधी वर्ग केला जाणार असून कोरोना विरोधात लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला या निधीतून मदत होणार आहे.ही महामारी रोखण्यासाठी संपूर्ण देशाने एकवटून पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन खासदार डॉ. महात्मे यांनी सर्वांना केले आहे. जेणेकरून आपल्याला या साथीवर मात करता येईल. संकटाच्या या घटनेत केंद्र व राज्य सरकार पीडितांवर योग्य उपचार होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लोकांनाही जागरूक करण्याची गरज आहे. सामान्य लोकांना घरात राहण्याची गरज समजून घेतली पाहिजे. विनाकारण घरा बाहेर पडू नका. या साथीने गरीब – श्रीमंत सगळ्यांनाच त्रस्त केले आहे. सध्या तरी social distancing हाच एक मार्ग सयुक्तिक वाटतो. आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेकडेही  विशेष लक्ष द्या.  केंद्र व राज्य सरकार चांगली कामे करीत आहेत. खासदार महात्मे संसदेच्या अधिवेशना नंतर  दिल्लीहून परत येताच नागपुरात कोरोनाविरूद्धच्या लढ्यात सक्रिय झाले आहेत. बुधवारी,  दिवसभरात विविध विभागाच्या च्या अधिका-यां कडून  माहिती घेतली  आणि कोरोनाशी लढण्याचा एक्शन प्लान तयार केला. तद्नंतर  आपली मते व सूचना त्यांनी मा. केन्द्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन जी , केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक अधिका-यां कडे ईमेल ने पाठविल्या.  गुरुवारी, ते पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि आरोग्य व प्रशासकीय अधिकारी यांचे समवेत  कोरोनाच्या प्रतिबंधाच्या तयारी ची पाहण करण्या साठी शासकीय  वैद्यकीय रुग्णालय आणि मेयो रुग्णालयात दाखल झाले. तत्पूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्या  सूचनांबाबत त्यांचेशी चर्चा केली .
कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री बारापासून संपूर्ण देश लॉकडाऊन होत असल्याची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन 21 दिवस राहणार आहे. तर राज्य सरकारनेही कडक निर्बंध आणले आहेत. नागपुर जिल्ह्यात कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून कोरोना व्हायरस विरोधात संपूर्ण जिल्हावासीय लढा देत आहेत. जिल्हा प्रशासन याबाबत गंभीर असून कोरोना नियंत्रणासाठी कसोशीने प्रयत्नशील आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे यंत्रणेवरती ताण येत आहे. या पार्श्‍वभूमिवर नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा मिळावी आणि प्रशासनालाही निगडीत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी  खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून 50 लाखाचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात यावा, अशी सूचना केली आहे.

Published by

Team Nagpur Updates

Nagpur Updates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Exit mobile version