12 सप्टेंबर पासून नागपूर मार्गे 18 विशेष रेल्वेगाड्या
नागपुर: रेल्वे प्रवासी वहातुकीस वेग देण्याचे उद्देश्याने मध्य रेल्वे तर्फे नव्या विशेष गाड्यांचे परिचलन केले जात आहे त्यामुळे नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावरून 18 विशेष गाड्यांचा पर्याय आता उपलब्ध असेल. म्हणूनच शनिवारला 18 विशेष गाड्या नागपुर स्थानकावरून सुटल्या, मध्य विभागातील सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी यांनी प्रवास हेतुने स्थानकावर येणा-या लोकांना विनंती केली. स्टेशनवर कोरोना विषयक निर्देशांचे पालन करणे अनिवार्य आहे तसेच मास्क, सोशल डिस्टेंस पालन, थर्मल स्क्रिनींग तपासणी ई. अनिवार्य आहे, त्याचबरोबर रेल्वेस्थान कावर दिड तास आधी येथे उपस्थित राहणे अनिवार्य आहे, एंट्री व एक्झिट गेट वर थर्मल स्क्रिनींग तपासणीचा उपयोग करून प्रवाशांची तपासणी केली जाईल आणि त्याच बरोबर कॉरंटाइन स्टॅम्प लावला जाईल. ते म्हणाले, आजपासून काही नव्या गाड्यांचे परिचलन सुरू केले गेलेय, आधी 16 व आता नव्या 18 गाड्यांची व्यवस्था आता नागपूर स्थानकाहून आहे, या गाड्या विभिन्न दिशांत धावणा-या आहेत जसे गांधीधाम, चेन्नई, सिकंदराबाद, बेंगलुरु, जयपुर, मैसूर, पूरी या प्रकारे सर्व परिचालन सुरू झालेय त्यानुषंगे आता ज्यांचे कंफर्म वा आरएसी तिकीट आहे तेच प्रवासी यात्रा करू शकतील, वेटिंग असणा-यांना आता आधिप्रमाणे यात्रा करता येणार नाही, चार्ट तयार होताच ते ड्रॉप होऊन त्यांचे तिकिटाचे पैसे परत होतील. स्थानकावरही एक दीड तास आधी पोचने आता क्रमप्राप्त असून, सर्व स्क्रिनींग प्रकिया पुर्ण करणे बंधनकारक आहे, प्रवासादरम्यानही पुर्णवेळ मास्क लावणे व सोशल डिस्टेंस पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले, स्थानकांवर आता आत्मा थर्मल तपासनी संयंत्र लागले आहे, नागपूर पासूनच याची सुरूवात झालीय क्या दरम्यानच तिकिट तपासनीही होते. सर्व प्रक्रीया पार केल्यानंतरच आत स्टेशनात प्रवेश मिळतो, चेक आऊट वरही अशीच थर्मल स्क्रिनींग व कॉरंटाइन स्टॅम्प लावण्याची प्रक्रीया असणार आहे.