NMC

रूग्णवाहीकांचा तुटवडा पहाता झोननिहाय नव्या ४ वाहिका: मनपाचा तातडीचा उपक्रम

नागपूर:- बुधवारी स्थायी समिती अध्यक्ष मा.श्री.विजय (पिंटू) झलके आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी हिरवी झंडी दाखवून ॲम्बुलन्स नागरिकांच्या सेवेत रुजू केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. निर्भय जैन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बर्हीरवार, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, प्रादेशीक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक (RTO) सी.एच.जमधाडे व संजय फेंडारकर, मनपा परिवहन विभागाचे रविन्द्र पागे, अरुण पिपुरडे आदी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून २५ रुग्णवाहिका बुधवारपासून नागरिकांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. महानगरपालिकेत सध्या ४० रुग्णवाहिका कार्यरत असून त्यामध्ये २५ रुग्णवाहिकांची नव्याने भर पडली आहे. मा.महापौर श्री. संदीप जोशी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता शहरातील नागरिकांसाठी जास्तीच्या रुग्णवाहिका घेण्याचे निर्देश दिले होते. अलिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे रुग्णवाहिकेची कमतरता जाणवत होती.

स्थायी समिती अध्यक्ष मा.श्री. विजय झलके यांनी सांगितले की सद्या कोव्हीडचा प्रकोप वाढल्यामुळे रुग्णवाहिकेची कमतरता लक्षात घेता कोव्हीड रुग्णांसाठी ६५ ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका नागरिकांना विना मूल्य उपलब्ध करुन दिली जाईल. यासाठी संबंधितांनी झोन कार्यालयामध्ये संपर्क साधावे.

आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार कोरोना बाधितांसाठी प्रत्येक झोन मध्ये चार रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कोव्हीड केअर सेंटर आणि मनपा मुख्यालयात देखील रुग्णवाहिका उपलब्ध राहतील. गरजेनुसार कोरोना बाधितांसाठी झोन कार्यालयमध्ये फोन करुन ॲम्बुलन्स मागविता येईल. पूर्वी मनपाकडे २० रुग्णवाहिका होत्या मागच्या आठवडयात त्यांची संख्या वाढवून ४० करण्यात आली आणि आता त्यामध्ये २५ ॲम्बुलन्संची भर पडणार आहे.

मनपा आयुक्तांनी रुग्णवाहिकेमध्ये पोर्टेबल ऑक्सीजन सिलेंडर, वाहन चालकासाठी मास्क, हँड ग्लोज (हात मोजे), सॅनिटायझर स्ट्रो ची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. ही रुग्णवाहिका नागरिकांसाठी २४ तास (24X7) उपलब्ध राहील. ‍

झोन स्तरावर कोरोना नियंत्रण कक्षाचे फोन नंबर
अ.क्र. झोन कार्यालयाचे नांव टेलीफोन नंबर
१ लक्ष्मीनगर झोन क्र.०१ 0712 – 2245053
२ धरमपेठ झोन क्र.०२ 0712 – 2567056
३ हनुमाननगर झोन क्र.०३ 0712 – 2755589
४ धंतोली झोन क्र.०४ 0712 – 2465599
५ नेहरुनगर झोन क्र.०५ 0712 – 2702126
६ गांधीबाग झोन क्र.०६ 0712 – 2739832
७ सतरंजीपूरा झोन क्र.०७ मो.नं.7030577650
८ लकडगंज झोन क्र.०८ 0712 – 2737599
९ आशीनगर झोन क्र.०९ 0712 – 2655605
१० मंगळवारी झोन क्र.१० 0712 – 2599905

Team Nagpur Updates

Nagpur Updates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.