बर्ड फ्लू इफेक्ट: नॉन व्हेजर्सची चिकनला नापसंती

नागपूर:- राज्यात बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याचे वृत्त आल्या ने खवय्यांनी चिकन व अंड्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे

याचाच परिणाम नागपुर मधील सावजी भोजनालयांवरही झालेल्या दिसून येतोय, चिकन अंडी विक्रीत कमालीची घट झाली आहे, विशेष म्हणजे चिकन अंडी खाणाऱ्यांची संख्याही कमालीची घटली आहे, याऐवजी मटन व शाकाहारास सर्वत्र प्राधान्य दिले जात आहे.

देशभरात अनेक ठिकाणी कावळे, कोंबड्या व अनेक पक्षी मरून पडल्याच्या बातम्या समोर येत आहे त्यामुळे नागरिकांनी तसे खाद्य दूर ठेवल्याचे चित्र समोर येत आहे, चिकन खाणा-यांची संख्या 60 ते 70 टक्क्यांनी कमी झाली आहे. बर्ड च्या भिती पोटी ग्राहक दिवसेंदिवस चिकन पासून लांब राहण्याचा प्रयत्न करताहेत असे चित्र आहे याबाबत विवीध माध्यमांवर जागरूकता करण्यात येत आहे, विशिष्ट तापमानापर्यंत शिजवलेले मांस हानिकारक ठरत नाही, केवळ कच्चे मांस खरेदि विक्री वेळी दक्षता बाळगावी असे सांगीतले जाते आहे मात्र लोक याबाबत सावध पवित्रा बाळगून आहेत

कोंबड्या मेल्या पण बर्ड फ्लू कि डिजे च्या आवाजाने?

नागपूर:- राज्य बर्ड फ्लू च्या शिरकावाने दहशतीत आहे अशात आता नागपूरात डि जे च्या आवाजाने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना समोर आलीय.

अधिकृत पुष्टी होऊ शकली नसली तरी पशुसंवर्धन विभागाकडून त्यांचा मृत्यू डि जे च्या दनदनाट आवाजाने झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे.
कळमेश्वरच्या परिसरात उदगी फार्मवर हा प्रकार घडला. या परिसरात जोरदार आवाजात डि जे वाजवला गेल्याचे तपासांती कळले, फॉर्ममधील कोंबड्या आवाजाने घाबरल्या व सैरावैरा पळू लागल्या. चेंगराचेंगरीत तब्बल अडिचशे कोंबड्या मृत्युमूखी पडल्या.

राज्यात सुरू बर्ड फ्लू ची संक्रमनामुळे या कोंबड्यांनाही तशी लागण झाली होती का अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे

त्यामुळे या मृत वर्षांत तपासणीसाठी पाठवण्यात आले तोपर्यंत परिषद प्रशासनाकडून फॉर्म संचालकांस दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या

मकरसंक्रांति पतंगोत्सव खरेदीही करा ऑनलाइन

नागपुर:- प्रथमच I.T SECTOR मधील काही युवकांनी सद्यस्थितीत फैललेल्या COVID च्या संसर्गापासून बचावासाठी एक नवीन project सुरू केला आहे, याद्वारे संक्रांति सणाचा आपला आनंद कायम राखता येईल शिवाय कोरोना संक्रमणाची भितीही असणार नाही.

हे भारतातील पहिलेच असे E-COMMERCE स्टोर आहे.ज्यावर पतंग विक्री आहे, या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येकजण कोविडशिवाय सहजपणे संक्रांती सण साजरा करू शकेल. नागपुरात ई-कॉमर्स पतंग, इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्या घरी पोचती करण्याचे काम सुरू झाले आहे.
सीबीएटी ही नागपूरची एक सॉफ्टवेअर कंपनी आहे ज्यांनी हा प्रकल्प सुरू केला आहे. आपल्या कडील सर्व मुलांना याचा फायदा झाला पाहिजे, यामध्ये कोविड संबधीच्या जागृतीविषयक घोषणाही दिल्या जातील.
या पुढाकाराने, आपणास गर्दिपासून वाचविण्यात येईल आणि उत्तरायण / मकरसंक्रांती सणाच्या संपूर्ण कोविड फ्री असा आनंद घेता येईल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करा.
http://Www.patang.cbat.in

गांधीबाग झोनमध्ये साडेचार टन प्लॉस्टिक जप्तl

प्रतिबंधित प्लॉस्टिक संदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गांधीबाग झोनमध्ये मंगळवारी (ता.१२) मोठी कारवाई करण्यात आली. गांधीबाग झोनमधील उपद्रव शोध पथकाचे (एनडीएस) प्रमुख सुशील तुप्ते आणि त्यांच्या पथकाद्वारे ४ हजार ५०० किलो (साडेचार टन) नॉन ओवेन प्लॉस्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आली. यामध्ये प्रतिबंधित नॉन ओव्हन प्लॉस्टिक कॅरी बॅगच्या दहा बॅग जप्त केल्या. या मालाची अंदाजे किंमत साडेपाच लाख रुपये आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. १२) सकाळी ६ वाजून १५ मी. रियाज लॉन कळमना मार्केट जवळ करण्यात आली. मनपाच्या या कारवाईबद्दल महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी उपद्रव शोध पथकाचे अभिनंदन केले.

पकडण्यात आलेले वाहन क्रमांक एमएच ४८ बीएम १२३१ असून गाडी चालकाचे नाव रविंद्र पाल असे आहे. गाडीचे कागदपत्र तापासल्यानंतर हा सर्व माल इतवारी येथील तीन नल चौकात राखी टेक्सटाईल्स येथे पाठवला जात होता. राखी टेक्सटाईल्स मधून नागपूर शहरातील इतर भागात ही प्लॉस्टिक पुरवली जात असे. उपद्रव शोध पथक प्रमुख विरसेन तांबे यांनी दिलेल्या सुचनेनूसार वाहन गांधीबाग झोनमध्ये आणण्यात आले.

कारवाईची माहिती अप्पर आयुक्त श्री. राम जोशी आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ प्रदीप दासरवार यांना देण्यात आली. काही वेळातच गांधीबाग झोनचे सहाय्यक आयुक्त अशोक पाटील व झोन अधिकारी सुरेश खरे घटनास्थळी पोहचले. नविन वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

प्रतिबंधित प्लॉस्टिक कॅरी बॅगने भरलेली गाडी छत्तीसगड येथिल मारूती नॉन ओव्हन प्लास्टिक लिमीटेड, राजनांदगाव येथून आली होती. ही गाडी १० जानेवारीला राजनांदगाव येथून निघाली आणि १२ जानेवारीला नागपूरात पोहचताच उपद्रव शोध पथका(एनडीएस) ने कारवाई करीत साडेपाच लाखाचा माल जप्त केला.

News Credit To NMC

गांधीबाग मधे अतिक्रमनका-यांवर कहर

नागपूर:- गांधीबाग झोनमध्ये अतिक्रमण करणार्‍यांवर सातत्याने कारवाई करूनही पदपथ व रस्त्यावरुन दररोज अतिक्रमण होतच आहे. गांधीबाग आणि इतवारीचे काही रस्ते रुंद आहेत, परंतु अतिक्रमणामुळे त्यांची अवस्था बोळांसारखी झाली आहे. दिवसभर रस्त्यावर जाम मुळे गांधीबाग झोनचे सहाय्यक आयुक्त अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज कारवाई केली जात आहे. सोमवारी गांधीबाग झोनचे पथक अतिक्रमणधारकांवर तुटून पडले.

पथकाने केवळ 18 अतिक्रमणेच हटविली नाहीत तर 8 ठेले जप्त केले. तसेच वारंवार इशारा देऊनही अतिक्रमण करणा-या दुकानदारांकडून 32 दंड वसूल केला. तत्पूर्वी, पथकाने इतवारी भाजी मंडईतील मोडकळीस आलेल्या घरावर कारवाई केली. शहीद चौकातील दिवाकर रायकर आणि भाडेकरू जैन यांना 29 सप्टेंबर रोजी नोटीस बजावण्यात आली होती. परंतु जीर्ण झालेले घर पाडले गेले नाही. केव्हाही अनुचित प्रकार घडून येण्याची शक्यता असल्याने पथकाने कारवाई करत जर्जर भाग तोडण्याची प्रक्रिया सुरू केली.

राजभवन परिसरात 22: महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आठवडाभर नागपूर दौर्‍याची माहिती मिळाल्यावर मनपाच्या अंमलबजावणी विभागाचे पथक सक्रिय झाले. गेल्या दोन दिवसांपासून राजभवन भोवतालची अतिक्रमणे साफ करण्याची मोहीम सुरू झाली. रविवारी सुट्टी असूनही, आजूबाजूचे अतिक्रमण हटविण्यात आले होते, परंतु दुसर्‍याच दिवशी परिस्थिती पूर्ववत झाली, यामुळे सोमवारी पथकाने पुन्हा कारवाईला सुरवात केली. आजूबाजूला एकूण 22 अतिक्रमणे साफ करण्यात आली. यानंतर बिजलीनगर समोरील पदपथावरील तात्पुरत्या झोपड्या देखील पाडण्यात आल्या. बिजलीनगर ते रामगिरीपर्यंत डब्ल्यूसीएल मुख्यालयासमोरील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात आले.

अवैध बांधकाम, दंड वसूलः धरमपेठ झोन अंतर्गत अभ्यंकरनगरमध्ये मालमत्ताधारक लीला बेलसरे यांनी अवैध बांधकाम केले. महाराष्ट्र टेरिटोरियल प्लॅनिंग अँड टाउन कंपोजिशन कायद्यांतर्गत अवैध बांधकाम तोडण्यासाठी मालमत्ताधारकाला नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये दिलेला वेळ संपताच हे पथक सोमवारी पोहोचले. पथक येताच मालमत्ताधारकाने नकाशा मंजुरीसाठी पाठविला जात असल्याची माहिती दिली. यानंतर पथकाने 5 हजार रुपये दंड केला. तसेच पथकाने अग्रवाल यांच्या भंगार दुकानावर 2 हजार रुपए दंड कारवाई केली. मोजमाप काटा देखील ताब्यात घेतला. या कारवाईत अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त महेश मोरोने, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे, नरेंद्र तोटेवार, भास्कर मालवे, नितीन शेरेकर, मनोहर राठोड, सुनील बावणे, आतिश वासनिक, विशाल ढोले आणि शादाब खान यांनी सहभाग घेतला.

लस आधी आरोग्य कर्मचा-यांना: जिल्ह्यात संपूर्ण झाली तयारी

नागपूर:- कोरोनाच्या भयावह वातावरणात आता जरा दिलासा मिळेल. 16 जानेवारीपासून जिल्ह्यातही कोरोनाची लस टोचणी सुरू केली जाईल. या संदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि जि.प. सीईओ यांनी अधिका-यांची भेट घेतल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तयारीचा आढावा घेतला आणि योग्य मार्गदर्शक सूचनाही दिल्या.

जिल्हाधिकारी म्हणाले की कोरोना प्रतिबंधक लस 15 ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली असून सर्वप्रथम ती खासगी व शासकीय आरोग्य क्षेत्रात काम करणा-या कर्मचा-यांना दिली जाईल. त्यासाठी कोविड पोर्टलमध्ये आतापर्यंत 11,645 आरोग्य कर्मचारी नोंदणीकृत केले गेले आहेत. या बैठकीस आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक थेटे व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, आरोग्य कर्मचा-यांनंतर नागरिकांना लसी देण्याच्या संदर्भात चर्चा झाली.

एका सत्रात 100 लसी: जिल्हाधिका-यांनी माहिती दिली की जिल्ह्यातील 10 ग्रामीण रुग्णालये, 2 उपजिल्हा रुग्णालय, 2 पीएचसी बोरखेडी, गोंडखेरी व सावनेर येथे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात अशा 15 ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण यंत्रनेस काळजीपूर्वक तसेच तयार रहाण्यास सांगण्यात आले आहे. कर्मचार्‍यांना लसीकरणासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.

एका सत्रात 100 कर्मचार्‍यांना लसी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना अर्धा तास एका खोलीत बसवले जाईल. कोणत्याही प्रकारची रिएक्शन असल्यास त्वरित उपचार करण्यात येतील. येणा-या कोणत्याही कर्मचार्‍यास कोरोनाची चिन्हे दिसत असल्यास, स्वॅब तपासण्याची गरज संबंधीत निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमेचे नियंत्रण अधिकारी स्वतः जिल्हाधिकारी आहेत.

राज्यपाल भेट पार्श्वभूमीवर तरी होऊं द्या विदर्भाचा विचार

नागपूर:- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी 12 जानेवारी रोजी विदर्भात येत आहेत. ते येथे 6 दिवस राहतील आणि विविध भागांना भेट देतील तसेच काही कार्यक्रमांमध्ये सामील होतील. त्यांचा राजभवनातही मुक्काम असेल. ते संपूर्ण आठवडा विदर्भात असताना विदर्भाची रखडलेली विकास कामे, सिंचन प्रकल्पांची स्थिती, सिंचन अनुशेष तसेच वन्यजीव पर्यटन, रस्त्यांचा अनुशेष इत्यादी समस्यांकडे लक्ष देण्याची अपेक्षा विदर्भातील लोकांनी केल्यास बरे. विदर्भातील तरुणांच्या रोजगाराच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन या संदर्भात सरकारला शिफारस करावी, कारण सरकारचे दावे अन्य असू शकतील, तरीही विदर्भातील तरूण, लोक, शेतकरी यांच्यावर अन्याय आणि भेदभाव होतत आहे ही वस्तुस्थिती आहे. नागपूर कराराचे पालन केले जात नाही. विदर्भात राज्यपाल वास्तवीक आढावा घेतील, अशीच स्थानिकांना आशा आहे.

गोसीखुर्द अद्याप अपूर्ण: विदर्भाचे दुर्दैव आहे की, येथे 4 दशकापासून सर्वात मोठा सिंचन प्रकल्प गोसीखुर्द अद्याप अपूर्ण आहे. त्याचा खर्ब काही शे कोटींवरून हजारो कोटी रुपयांवर गेला आहे. आता पुन्हा एकदा हे काम लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तत्कालीन राज्यपालांच्या सूचनेनुसार तत्कालीन सरकारने 2016 पर्यंत हा सिंचनाचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम ठेवला होता, परंतु तो अद्याप पूर्ण झाला नाही. अनेक सिंचन प्रकल्प अद्याप अपूर्ण आहेत किंवा कागदपत्रांतच अडकून आहेत. लाखो हेक्टरचा अनुशेष झाला आहे. केवळ कृषी पंपांचा अनुशेष दूर करण्यासाठी सरकार सौर पंप बसविण्याचा कार्यक्रम चालवित आहे, परंतु अजून काहीत केल्यासारखे दिसत नाही. विदर्भातील शेतक-यांना 12 महिन्यांपर्यंत सिंचनाची सुविधा मिळाली तर ते समृध्द होतील.

रस्त्यांचा अनुशेषही कमी नाही: विदर्भाचे राजरस्ते, जिल्हा स्तर रस्ते इत्यादींमध्येही काही कामे दिसतात पण संपूर्ण विदर्भात ग्रामीण भागातील रस्त्यांचा मोठा अनुशेष आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात 11000 कि.मी. ग्रामरस्ते असून त्यातील 80 टक्के बेहाल आहेत. नव्या रस्त्यांचा अनुशेषही वाढत आहे. संपूर्ण विदर्भात जुने रस्ते सिमेंटिंग व रुंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे, परंतु नवीन रस्ते बांधण्याचे प्रमाण कमी आहे. यामुळे रस्ते विकासाचा अनुशेषही वाढत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत हा अनुशेष 6,655 कोटी होता, जो अजून वाढला आहे.

खनिज व वन उपज आधारित उद्योग विकसित नाहीत: राज्याची 97 टक्के खनिज संपत्ती विदर्भात असून वनक्षेत्रही 58 टक्के आहे, परंतु विदर्भात खनिज व वननिर्मिती आधारित उद्योग विकसित झाले नाहीत. सर्व काही पश्चिम महाराष्ट्रात हलविण्यात आले आहे वा त्यांची रवानगी केली जात आहे. तत्कालीन सरकारने आदिवासीबहुल जिल्ह्यांत बांबू आधारित उद्योग नक्कीच सुरू केले आहेत, परंतु ते अपुरे आहेत. विदर्भाच्या कोळशापासून येथेच वीज निर्मिती केली जाते, तर त्यातीलही केवळ 12-13 टक्केच कृषी पंपांना दिली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील कृषी पंपांना 62.13 टक्के वीज देण्यात आली आहे. याचे कारण तेथे कृषी पंपांची संख्या जास्त आहे. विदर्भ यातही मागासलेलाच आहे. आता सरकारने सौर पंप योजना सुरू केली आहे ज्यामध्ये सर्व पंप सौरउर्जेवर आणण्याचे काम चालू आहे. विदर्भात सर्वाधिक वने आहेत. येथे वन्यजीव पर्यटनाच्या अपार शक्यता आहेत. या संदर्भात, राज्यपाल विकासाच्या अधिक शक्यतांविषयी माहिती घेऊन शिफारसी करू शकतात.

4 लाख नोक-यांचा अनुशेष: महाराष्ट्रात विदर्भाचा समावेश केला गेला तेव्हा करारानुसार नोकर्‍या लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्या जाण्याचे संकेत आहेत. परंतु आजपर्यंत त्या कराराचे पालन झाले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी सर्व नोकर्या ताब्यात घेतल्या. आज विदर्भातील तरुणांना चतुर्थ श्रेणी ते वर्ग एक श्रेणीपर्यंतच्या नोकरीमध्ये मागास ठेवण्यात आले आहे. विदर्भातील नोक-यांचा अनुशेषच 4 लाखांवर पोहोचला आहे. करारानुसार इथल्या तरुणांना प्रत्येक विभागात रिक्त असलेल्या जागांवर 23 टक्के हक्क मिळायला हवेत, पण तसे झाले नाही. विदर्भाचा महाराष्ट्रात समावेश झाल्यापासून हा अन्याय इथल्या तरुणांना सहन करावा लागला आहे. विदर्भातील शिक्षण सुविधांनाही अनेक दशके मागास ठेवण्यात आले. सर्व सुविधा मुंबई, पुणे येथे हलविण्यात आल्या. तत्कालीन भाजपा सरकारने नागपुरात बरेच उच्च शिक्षण संस्था आणल्या असल्या तरी विदर्भ, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये अद्याप उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत.

जाणीवपूर्वक खर्च करत नाहित निधी: विदर्भातील नागरिकांचा असाही आरोप आहे की, विदर्भात सरकारी खात्यात विकासासाठी देण्यात येणारा निधी हा आर्थिक वर्षाच्या अखेरीस मुद्दाम खर्च केला जात नाही, आणि त्यामुळे दावा न केलेला निधी पुन्हा शासकी तिजोरीत जातो. वास्तविकता अशी की पश्चिम महाराष्ट्रातील अधिकारीच सर्व विभागातील उच्च पदावर आहेत. त्यांना विदर्भाचा वेगवान विकास नको आहे, म्हणून ते योजनांवर मुद्दाम खर्च करत नाहीत आणि सर्व निधी परत जातो. विदर्भाची स्थापना झाल्यापासून या षडयंत्रामुळे 60 हजार कोटींपेक्षा जास्त निधी परत गेला आहे. विदर्भाला अर्थसहाय्य देण्यासही भेदभाव केला गेला आहे. परंतु आता राज्यपालांनी या प्रश्नांची दखल घ्यावी व सूचना द्याव्यात अशी सर्वांची इच्छा आहे.

अवैध होर्डिंग व मोबाईल टॉवरवर कडक कारवाई करा : विजय (पिंटू) झलके

शहरात आजच्या स्थितीत अवैध होर्डिंगची संख्या मोठी आहे. याशिवाय अवैध मोबाईल टॉवर्सची वाढती संख्या नागरिकांसाठी धोक्याची ठरत आहे. होर्डिंग लावताना आणि टॉवर उभारताना मनपाच्या नियमावलीकडे दुर्लक्ष होत असल्याचाही प्रकार घडत आहे. या सर्व प्रकाराची तातडीने दखल घेत संबंधित अधिका-यांनी तात्काळ अवैध होर्डिंग आणि टॉवर संदर्भात कडक कारवाई करावी, असे निर्देश स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.

शहरातील अनेक भागात लावण्यात आलेल्या विविध अवैध होर्डिंग आणि मोबाईल टॉवर संदर्भात सोमवारी (ता.११) स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी आढावा बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत निगम सचिव डॉ.रंजना लाडे, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, अशोक पाटील, गणेश राठोड, हरीश राउत, सहायक आयुक्त किरण बगडे, साधना पाटील, उपअभियंता श्रीकांत देशपांडे, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, जितेंद्र तोमर आदी उपस्थित होते.

नागपूर शहरात दहाही झोन अंतर्गत ९९१ अधिकृत होर्डिंगची नोंद मनपाकडे आहे. होर्डिंगकरिता परवानगी देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे ही मनपाची जबाबदारी आहे. ‘स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट’शिवाय मनपाद्वारे कुठल्याही होर्डिंगला परवानगी देण्यात येत नसल्याची माहिती यावेळी संबंधित अधिका-यांमार्फत देण्यात आली. फेब्रुवारी २०१९ला दहाही झोनमधील सर्वे करण्यात आले. त्यामध्ये गांधीबाग झोनमध्ये ११, सतरंजीपुरा ८, लकडगंज ५, आसीनगर २१ व मंगळवारी झोनमध्ये ४ असे एकूण ४९ अवैध होर्डिंग आढळले आहेत.

सुमारे ११ महिन्याच्या आधीची सदर आकडेवारी असून उर्वरित एक ते पाच झोनची आकडेवारी लक्षात घेता ही संख्या शंभरावर जाण्याची शक्यता आहे. मनपाच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांपैकी होर्डिंगद्वारे मिळणारे उत्पन्न हे एक स्त्रोत आहे. सध्या मनपाला फक्त रु. १.२५ कोटी दरवर्षी उत्पन्न होत आहे. त्यामुळे यासंदर्भात प्रशासनाद्वारे आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. शहरातील अशा सर्व अवैध होर्डिंगवर आळा घालता यावा यासाठी आढळलेल्या अवैध होर्डिंगवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.

याशिवाय नागपूर शहरात एकूण ७७३ टॉवर्स आहेत. यामध्ये लक्ष्मीनगर झोनमधील १३१, धरमपेठ ६९, हनुमाननगर ९८, धंतोली ५२, नेहरूनगर ७९, गांधीबाग ६५, सतरंजीपुरा ३४, लकडगंज ७५, आसीनगर ७८ आणि मंगळवारी झोनमधील ९२ टॉवर्सचा समावेश आहे. या टॉवरकडून कर स्वरूपात वर्षाला २ कोटी ५२ लाख ७३ हजार ७९१ रूपये डिमांड प्राप्त होते. मात्र यापैकी अनेक टॉवर्स मनपाकडून रितसर परवानगी न घेता सुरू आहेत. त्याचा प्रभाव मनपाच्या उत्पन्नावर पडतो आहे. त्यादृष्टीने सर्व टॉवर एजन्सीला येत्या सात दिवसात रितसर परवानगी घेण्याबाबत तात्काळ नोटीस देण्याचेही स्थायी समिती सभापतींनी निर्देशित केले.

अवैध होर्डिंग आणि टॉवर संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. या दिशानिर्देशांचे पालन करीत सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून मनपाद्वारे पारदर्शी पक्रिया तयार करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. यासंदर्भात आवश्यक ते धोरण निश्चित करण्यात यावे. त्यामधून मनपाच्या उत्पन्न वाढीसह नागरिकांच्या सुविधेकडेही लक्ष देण्यात यावे, असेही निर्देश स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.
News Credit To NMC

नागपुर में बर्ड फ्लू? जिले में 500 से अधिक पक्षी मरे

नागपुर (कोंढाली):- बर्ड फ्लू देश के पांच राज्यों जैसे राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश और केरल में व्याप्त हो गया है। लेकिन राज्क्ष के पशुपालन विभाग के यह कहने के बावजूद कि महाराष्ट्र में अभी भी बर्ड फ्लू का कोई खतरा नहीं है, नागपुर जिले में 500 से अधिक पक्षियों की मौत हो गई है। जिला पशुपालन विभाग ने अभी तक पक्षियों की मौत का कारण स्पष्ट नहीं किया है।

हालांकि, क्षेत्र में इस तरह के जोखिम ने स्थानीय देहाती लोगों में भय का माहौल पैदा कर दिया है। नागपुर जिले के कोंढाली क्षेत्र के रिंगानाबोड़ी, मानिकवाड़ा, मसाला, शिवा, आकेवाड़ा क्षेत्रों में 500 से अधिक चिडीया, तोते और कौवे की मौत हो गई है। इस संबंध में, रिंगनबोडी के पुलिस पाटिल संजय नागपुरे ने कोंढाली के थानेदार विश्वास फुल्लरवार को सूचित किया।

काटोल तालुका पशुधन अधिकारी और कोंढाली पशुधन विकास अधिकारी प्रभारी डॉ तुषार पुंड और सुधीर कापसीकर इस तरह की जानकारी प्राप्त करने के लिए विभिन्न गांवों का दौरा कर रहे हैं। पशुपालन विभाग के स्थानीय अधिकारियों ने कहा कि मेडिकल रिपोर्ट के बाद ही पक्षियों की मौत का कारण स्पष्ट किया जाएगा।‌‌

नई नीति स्वीकार करें या हटा दिया जाएगा आपका व्हाट्सएप अकाउंट

टेक् टिम: व्हाट्सएप, फेसबुक के स्वामित्व वाली इंस्टेंट मैसेजिंग ऐप है जिसने अपनी गोपनीयता नीति को अपडेट करने कि ठानी और धीरे-धीरे उपयोगकर्ताओं को इस बारे मै सूचित कर रहा है। व्हाट्सएप ने नई नीति को स्वीकार करने के लिए 8 फरवरी 2021 तक का समय उपयोगकर्ताओं को दिया है।

इसके लिए यूजर्स को कोई विकल्प नहीं मिलेगा। हालाँकि, ‘अभी नहीं’ विकल्प भी यहाँ दिखाई देता है। मतलब यह है, कि यदि आप कुछ समय के लिए उनकी नई नीति स्वीकार नहीं करते हैं, तो आपका खाता चालू रहेगा। नई नीति फेसबुक और इंस्टाग्राम का संयोजन है, और उपयोगकर्ताओं के पास अब पहले से कहीं अधिक डेटा होगा। इससे पहले व्हाट्सएप का डेटा भी फेसबुक पर शेयर किया जा रहा था। लेकिन फेसबुक ने कहा कि व्हाट्सएप और इंस्टाग्राम का भी एकीकरण अधिक गहराई से होगा।

व्हाट्सएप की अद्यतन नीति में कहा गया है कि कंपनी को आपके द्वारा दिए गए लाइसेंस में कुछ प्रावधान हैं, जिसमें उनकी सेवाओं को संचालित करने के लिए व्हाट्सएप को अपलोड करने, जमा करने, स्टोर करने, भेजने या प्राप्त करने के लिए उपयोग करते हैं। इस सामग्री का उपयोग, पुनरुत्पादन, वितरण और प्रदर्शन करने के लिए गैर-अनन्य, रॉयल्टी-फ्री, इंस्ट्रूमेंटल और ट्रांसफ़रेबल लाइसेंस यह भी बताता है कि इस लाइसेंस द्वारा दिए गए अधिकार हमारी सेवाओं के संचालन और प्रदान करने के सीमित उद्देश्य के लिए हैं।‌‌

WhatsApp की नई गोपनीयता नीति आपको देती है केवल दो विकल्प; स्वीकार करो या आपका अकाउंट हटा दिया जाएगा

टेक् टिम: दुनिया भर में लोकप्रिय ऐप व्हाट्सएप अपने यूजर्स के लिए नए फीचर्स लेकर आ रहा है। इस साल ऐप में कई फीचर्स होंगे। WhatsApp अपनी नई प्राइवेसी पॉलिसी लेकर आया है। यदि उपयोगकर्ता इस नीति को स्वीकार नहीं करते हैं, तो उन्हें ऐप को हटाना होगा। जानें कि इस नई गोपनीयता नीति में क्या खास है

WhatsApp की नई शर्तें और गोपनीयता नीति
व्हाट्सएप यूजर्स को जल्द ही ऐप के नए टर्म और प्राइवेसी पॉलिसी से सहमत होना होगा। यह कहा जा रहा है, यदि आप इस गोपनीयता नीति से सहमत नहीं हैं, तो आप व्हाट्सएप का उपयोग नहीं कर पाएंगे। WABetaInfo के अनुसार, व्हाट्सएप 8 फरवरी 2021 को अपनी सेवा की शर्तों को अपडेट करेगा। अगर व्हाट्सएप उपयोगकर्ता इससे सहमत नहीं हैं, तो वे व्हाट्सएप का उपयोग आगे समय में नहीं कर पाएंगे

नई नीति में यह महत्वपूर्ण है: व्हाट्सएप की नई नीति, जो उपयोगकर्ताओं को लाइसेंस देती है, कहती है कि हमारी सेवाओं का उपयोग करने के लिए, आपको व्हाट्सएप का उपयोग करना होगा, जो सामग्री आप अपलोड करते हैं, जमा करते हैं, स्टोर करते हैं, भेजते हैं या प्राप्त करते हैं, उपयोग करते हैं, पुन: पेश करते हैं, वितरित करते हैं और दुनिया भर में प्रदर्शित करते हैं, गैर-अनन्य, रॉयल्टी संश्लिष्ट और हस्तांतरणीय लाइसेंस जारी किए जा रहे हैं।

वर्तमान में उपयोगकर्ताओं के पास विकल्प है
व्हाट्सएप में फिलहाल यूजर्स के पास Not Now का विकल्प है। इसका मतलब है कि यदि उपयोगकर्ता इस बदलाव को नही चाहते हैं, तो वे इसे (नॉट नाऊ) स्वीकार करेंगे। स्वीकार न होने पर भी ऐप फिलहाल चलता रहता है। इसके अलावा, नई नीति फेसबुक और इंस्टाग्राम को एकीकृत करेगी। व्हाट्सएप का डेटा भी फेसबुक के साथ साझा किया जा रहा था। लेकिन अब फेसबुक के साथ व्हाट्सएप और इंस्टाग्राम का एकीकरण पहले की तुलना में अधिक होगा।‌‌

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Exit mobile version