कोरोना कहर: महाल-गांधीबाग झोनमध्ये 6 तर शहरात 22 परिसर सील
नागपूर:- शहरात कोविड19 साथीचा प्रादुर्भाव किती वाढतो आहे याचा अंदाज प्रतिदिन वाढणार्या सकारात्मक रूग्णांच्या संख्येने तर येतोच शिवाय प्रतिबंधित भागांच्या वाढत्या संख्येनेही याचा अंदाज येतो, याचेच जिवंत उदाहरण म्हणजे गुरुवारी शहरातील 22 परिसर मनपा आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले. त्यातल्यात्यात महाल-गांधीबाग झोनमध्ये सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण मिळाल्यानंतर 6 भागात बंदी घालण्यात आली. या विभागातील प्रभाग 18 मध्येच 2 भाग सिल करण्यात आले.
त्यात महाल हेडगेवार निवास जवळ जोग गल्लीचा परिसर, राम मंदिर गल्लीत श्रीधर अपार्टमेंट्सचा परिसर, प्रभाग 19 मधील लाल इमली चौक परिसर, प्रभाग 22 मधील हमालपुरा ठाकरे वाडा परिसर, प्रभाग 8 मधील गोलिबार चौक परिसर आणि त्याच विभागातील भानखेडा येथील त्रिपिटक बुद्ध विहार जवळील परिसर सील करण्यात आले.
आसिनगर झोनचे 6 तर लकडगंजमध्ये 4 परिसर सील: महाल-गांधीबाग झोनप्रमाणेच, असीनगर झोनमध्येही कोरोना रूग्ण जास्त मिळाल्यामुळे गुरुवारी 6 परिसर सील करण्यात आले. ज्यामध्ये प्रभाग 7 अंतर्गत 4 परिसर सील करण्यात आले. प्रभाग 7 मधील बाळाभाऊ पेठेच्या व्हीएचबी कॉलनीचा परिसर, त्याच प्रभागातील नवानकाशा गल्ली क्रमांक १ परिसर, पाचपावली येथे कुर्हाडकर पेठेचा परिसर, जरीपटका येथील महात्मा गांधी शाळेजवळील परिसर, त्याच झोनच्या प्रभाग २ मधील गुरु तेज बहादूर सिटी कॉम्प्लेक्स, याच प्रभागात कामगार नगर चौकातील हिमांशू अपार्टमेंटचा परिसर सील करण्यात आला.
अशाप्रकारेच लकडगंज झोनमध्येही 4 परिसर सील करण्यात आले. लकडगंज विभागांतर्गत प्रभाग 24 मधील भरतनगर येथील हनुमान मंदिराजवळ, त्याच प्रभागातील गोकुळ डेअरीजवळील परिसर, प्रभाग 22 मधील टेलिफोन एक्सचेंज चौकातील दळवी रुग्णालयाजवळील परिसर, प्रभाग 24 मधील भवानी नगर स्थित दिनबंधू सोसायटीचा परिसर. अशी सिमाबंदीची कारवाई करण्यात आली.
मंगळवारी झोनमध्येही 3 परिसर सिल: येथील प्रभाग 9 अंतर्गत मेकोसाबाग येथील रजत विहार परिसर, याच प्रभागातील कडबी चौकातील साई मंदिर जवळ, कामठी रोड रेल्वे क्वार्टरचा परिसर, प्रभाग १० मधील सादिकाबाद रोडवरील अवस्थी नगर परिसर सील करण्यात आला. त्याशिवाय धरमपेठ विभागातील प्रभाग 12 अंतर्गत हजारीपहाड टेकड्यांवरील रचना सायंतारा फेज -2, धंतोली विभागातील प्रभाग 33 मधील कुकडे लेआऊट कॉम्प्लेक्स, प्रभाग 35 मधील दीन प्रजापती सोसायटीचा परिसर सिल करण्यात आला आहे.