वीजबिल भरण्यास्तव कर्मचा-यांचा पुढाकार
नागपूर: लॉकडाऊन काळात इलेक्ट्रिसिटी प्रणाली सुरळीत होती, त्यात खंड पडला नाही, मात्र मिटर रिडिंग व विजबिल भरणा केंद्र बंद असल्याने तब्बल दोन महिने वसूली रखडली, ऑनलाइन भरणा सेवा सुरू होती मात्र सर्वच ग्राहक अॅण्ड्रॉईड फोन अथवा ऑनलाईन पेमेंट सुविधा वापरन्यात सक्षम नसतात परिणामी वितरण कंपनी आर्थिक अडचणीत सापडलीय, अशावेळी सर्वस्तरावर प्रलंबीत भरणा करण्याचे ग्राहकांना आवाहन केले जातेय. अशावेळी महावितरणच्या मदतीला तिन्ही वीज कंपनी कर्मचारीच व्हॉट्सऍपवरून भावनिक मॅसेज पाठवून हातभार लावताहेत.
मोबाईल डेटा संपताच रिचार्ज केला जातो… एका घरात चार असे वर्षात तेरा रिचार्ज करतात… पण महिन्याचं साधं वीज बिल मात्र भरु शकत नाहीत… नवल आहे ना? अशा ओळींत वीज देयके भरण्याचे आवाहन कर्मचारी करीत आहेत.
त्यातच आता वीजबिल माफ करण्याची मागणी पुढे येऊ लागलीय. या संकटकाळात वीज कर्मचारी आपल्या संस्थेच्या बाजुने उभे रहात वीजबिल माफी मागणी करणाऱ्यांसमोर मोबाईल आणि वीजबिलाची तुलना मांडून वीजबिल भरण्याचा आग्रह धरत आहेत.लॉकडाउन काळात वितरण कंपनीला 7 हजार 200 कोटींचे नुकसान सहन करावे लागले. एप्रिल महिन्यात केवळ 40 टक्केच वसुली झाली असून मे महिन्यातील वसुली 25 टक्क्यांच्या आतच असण्याची शक्यता आहे.