नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी मंत्री व भाजपचे उमेदवार श्री चंद्रशेखर बावनकुळे प्रचंड मताधिक्याने विजयी

नागपूर :- विधानपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज नागपुरात पार पडली. माजी मंत्री व भाजपाचे उमेदवार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस समर्थक श्री मंगेश देशमुख यांचा दारूण पराभव केला. मतमोजणीत श्री बावनकुळे यांना 362 मते तर श्री मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली. श्री बावनकुळे यांनी 176 मतांनी श्री मंगेश देशमुख यांचा पराभव केला.

नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये (Election) महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपकडून (BJP) व्यक्त करण्यात येत आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असतानाच भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आघाडी घेतली होती. माजी ऊर्जा मंत्री तसेच भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष मंगेश देशमुख यांच्यात थेट लढत झाली.

559 मतदारांपैकी 554 मतदारांनी या निवडणुकीत हक्क बजावला. यात बावनकुळे यांना 362 मते मिळालीत तर मंगेश देशमुख यांना 186 मते मिळालीत. तर 5 मते बाद झालेत.

Published by

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Exit mobile version