गांधीबाग झोनमध्ये साडेचार टन प्लॉस्टिक जप्तl
प्रतिबंधित प्लॉस्टिक संदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गांधीबाग झोनमध्ये मंगळवारी (ता.१२) मोठी कारवाई करण्यात आली. गांधीबाग झोनमधील उपद्रव शोध पथकाचे (एनडीएस) प्रमुख सुशील तुप्ते आणि त्यांच्या पथकाद्वारे ४ हजार ५०० किलो (साडेचार टन) नॉन ओवेन प्लॉस्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आली. यामध्ये प्रतिबंधित नॉन ओव्हन प्लॉस्टिक कॅरी बॅगच्या दहा बॅग जप्त केल्या. या मालाची अंदाजे किंमत साडेपाच लाख रुपये आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. १२) सकाळी ६ वाजून १५ मी. रियाज लॉन कळमना मार्केट जवळ करण्यात आली. मनपाच्या या कारवाईबद्दल महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी उपद्रव शोध पथकाचे अभिनंदन केले.
पकडण्यात आलेले वाहन क्रमांक एमएच ४८ बीएम १२३१ असून गाडी चालकाचे नाव रविंद्र पाल असे आहे. गाडीचे कागदपत्र तापासल्यानंतर हा सर्व माल इतवारी येथील तीन नल चौकात राखी टेक्सटाईल्स येथे पाठवला जात होता. राखी टेक्सटाईल्स मधून नागपूर शहरातील इतर भागात ही प्लॉस्टिक पुरवली जात असे. उपद्रव शोध पथक प्रमुख विरसेन तांबे यांनी दिलेल्या सुचनेनूसार वाहन गांधीबाग झोनमध्ये आणण्यात आले.
कारवाईची माहिती अप्पर आयुक्त श्री. राम जोशी आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ प्रदीप दासरवार यांना देण्यात आली. काही वेळातच गांधीबाग झोनचे सहाय्यक आयुक्त अशोक पाटील व झोन अधिकारी सुरेश खरे घटनास्थळी पोहचले. नविन वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
प्रतिबंधित प्लॉस्टिक कॅरी बॅगने भरलेली गाडी छत्तीसगड येथिल मारूती नॉन ओव्हन प्लास्टिक लिमीटेड, राजनांदगाव येथून आली होती. ही गाडी १० जानेवारीला राजनांदगाव येथून निघाली आणि १२ जानेवारीला नागपूरात पोहचताच उपद्रव शोध पथका(एनडीएस) ने कारवाई करीत साडेपाच लाखाचा माल जप्त केला.
News Credit To NMC