दुचाकी वाहनाकरीता नवीन मालिका सुरु, ऑनलाइन प्रक्रियेमुळे डीलरशिपमध्येच वाहनांची नोंदणी
सध्याची MH49-BV ही मालिका समाप्त होत आहे, त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर पूर्व, 25 ऑगस्टपासून दुचाकींसाठी MH49-BX ही नवीन मालिका सुरू करणार आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. वाहनांचा नवीन नंबर 1 दिवसात येत आहे, तर नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया अवघ्या 2 ते 3 दिवसांत होत आहे. यासाठी कुठेही हेलपाट्या मारण्याची गरज राहिलेली नाही. मुख्यत: आरटीओची संपूर्ण जबाबदारी संपुष्टात आली आहे. संपूर्ण जबाबदारी वाहन विक्रेत्यांवर सोपवल्यामुळे हा मोठा बदल दिसून येत आहे. या आदेशानंतर जिल्ह्यातील किमान 750-1000 ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंतचा अनुभव खूप क्लिष्ट होता. वाहन घेऊनही अनेक दिवसपर्यंत वाहन नोंदणी होऊ शकत नव्हती. त्यामुळे ग्राहक व व्यापाऱ्यांना अनेकप्रकारे त्रासाला सामोरे जावे लागत होते. आरटीओ अधिकार्यांचा प्रत्येक डीलरशी बांधल्या गेल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. वाहनाची नोंदणी करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत होती. आरटीओ अधिकारी सायंकाळी वाहनांची तपासणी करून मंजुरी देत असे, यामुळे विलंब व्हायचा.