आता हजार ऐवजी ₹१० हजार दंड
नागपूर:- आर्थिक प्रणाली पुन्हा रुळावर आणण्यासाठी कोविड -१९ विषयक च्या केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करत काही अटींवर संचारबंदीत शिथिलता देण्यात आली होती. दुकान उघडण्याचे, बंद करण्याचे वेळोवेळी टाइम टेबलही निश्चित केले गेले आहे. दुकानदार व ग्राहकांचे मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसींग पाळणे, व ग्राहक गेल्यानंतर, सॅनिटाईजेशन, स्वच्छता करणे अनिवार्य केले गेले आहे, परंतु सर्व मार्गदर्शक सूचनांचे उघडपणे उल्लंघन केले जात असल्याचेच सर्वत्र निदर्शनास येत आहे.
अशा नियमबाह्य वागणूक असणा-या दुकानदारांविरूद्ध कठोर पावले उचलत मनपा प्रशासनाने स्वच्छता उपायुक्त ते निरीक्षक, एनडीएस जवान, पोलिस निरीक्षक व वरिष्ठ अधिकारी यांना कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. अधिकारांचा वापर करून शहरातील विविध बाजारपेठांतील 56 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आणि 3 लाख 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.