Nagpur Police
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये
नागपूर:- शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी सिव्हिल लाइनमधील महापालिकेच्या नवीन इमारतीत स्थित अटल बिहारी वाजपेयी शहर ऑपरेशन सेंटर गाठले आणि तेथील कामांचा आढावा घेतला. येथील कार्यप्रणालीही समजून घेतली, यावेळी ते म्हणाले की स्मार्ट सिटीच्या या कॅमे-यांमुळे गुन्हेगारांना पकडण्यात बरीच मदत होत आहे. त्यांनी स्मार्ट सिटीच्या कामांचे कौतुक केले व आवश्यक त्या सूचना दिल्या.
नागपूर स्मार्ट एण्ड सस्टेनेबल डेवलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेडच्या ई-गव्हर्नन्स विभागामार्फत मनपा प्रशासकीय इमारतीच्या स्मार्ट सिटी हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वाहतूक शाखेचे सर्व डीसीपी आणि पोलिस निरीक्षक, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने, कंपनीचे सचिव भानुप्रिया ठाकूर, मनपाचे वाहतूक अभियंता शकील नियाझी आदी उपस्थित होते.