Nagpur Local

पावसाळ्याआधीच नद्यांचे पुनरुज्जीवन

नागपूर: पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लॉकडाउनच्या कालावधीतच शहरातील नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवन प्रकल्पांचे काम पावसाळ्याआधीच पूर्ण केले आहे. या कामगिरीचे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही कौतुक केले.

ट्विटवर मुंढेनी याबाबत माहिती दिली: नाग नदीचे पुनरुज्जीवन केले गेलेय. नद्या शहरातील चैतन्य आणि उत्साह कायम ठेवण्याचं काम करतात. महानगरपालिकेने खोलीकरण, साफसफाई आणि डी-सिल्टिंग करून शहरातील नद्यांचे पुनरुज्जीवन केलेय. नद्यांचे जतन, संरक्षण आणि मजबुतीकरण आपले कर्तव्य आहे, शहराची संस्कृती नाग नदीशी जोडलेली आहे. मात्र मागील काही वर्षांत नदीचे नाल्यामध्ये रुपांतर झाल्याचे पहायला मिळालं. नागपूरमधील पिवळी नदी आणि पोरा नदीचीही हीच परिस्थिती होती. त्यामुळेच नागपूर शहर ज्या नदीवर वसले आहे ती नदी स्वच्छ केली पाहिजे या विचारांती केवळ स्वच्छता मोहीमच नाही तर पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेतला. सामान्यपणे मे महिन्यात हे काम व्हायच पण लॉकडाऊन मुळे मार्चमध्येच काम सुरु केलं आणि आज तिन्ही नद्या नागपूरकरांना पुर्वीसारख्याच स्वच्छ स्वरुपात भेट म्हणून देण्यात येत आहेत. या नदीमध्ये मोठ्याप्रमाणात घनकचरा, द्रव्य आणि प्राण्यांची संख्या होती हे दिसून आलं. दरवर्षी केवळ गाळ काढून नदीचकिनारी ठेवला जायचा. पावसाळ्याच्या काही दिवस आधी घाईघाईत ही सफाई व्हायची, काढलेला गाळ दुसऱ्या जागी हलवण्याआधीच पाऊस यायचा आणि गाळ पुन्हा नदीत जायचा. त्यामुळे जोरदार पाऊस झाल्यास नदीकाठच्या परिसरामध्ये पाणी साचायचे. याच गोष्टी टाळण्यासाठी या वर्षी नदीपात्रातून काढलेला गाळ आणि कचऱ्याची शहरातील इतर भागांमध्ये विल्हेवाट लावली. यामुळे दोन फायदे झाले. नदी पूर्णपणे स्वच्छ होऊन आधीसारखी दिसू लागली आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या नदीमधील गाळ शहरातील सखल भागामध्ये टाकल्याने तिथेही पाणी साचण्याची शक्यता कमी झालीय. नाग नदीचा शहरात १७ किलोमीटरचा फेरा आहे. या १७ किलोमीटर अंतरास ५ टप्प्यांमध्ये, पिवळी नदीची ४ टप्प्यांमध्ये तर पोरा नदीची ३ टप्प्यांमध्ये स्वच्छता करण्यात आली. पुन्हा या कामाची जबाबदारी एकाच अधिकाऱ्यावर न देता प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. त्यामुळेच जलदगतीने काम शक्य झालं. शहरातील एकूण ४८ किलोमीटर लांबीच्या पात्रामधून घाण, कचरा आणि गाळ कढण्यात आला. महानगरपालिकेने अवघ्या दोन महिन्यांमध्ये इतर संस्थाच्या मदतीने हे काम करुन दाखवलं

आदित्य ठाकरे यांनीही मुंढेंचे ट्विट रिट्विट करत या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. “आम्ही नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी वचनबद्ध आहोत. या कायाकल्पाला या वर्षाच्या सुरूवातीला पाठिंबा देत पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने मान्यता दिली होती” असे त्यांनी लिहिलेय.

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.