NMC

मुंढेंची बदली? नागपूरकर भडकले: ऑनलाइन पेटेशन वर धड़ाकेदार प्रतिसाद

नागपूर:- गेले काही दिवस महानगरपालिकेचे आयुक्त मुंढे यांच्या संभावित बदलीच्या चर्चेवर नागपूरकर आक्रामक झाल्याचे चित्र आहे. नागपूरकरांनी मुंढेंच्या समर्थनार्थ ‘जनतेचा विश्वासदर्शक ठराव’ या आशयाची ऑनलाईन पिटीशन सुरु केली. पहिल्याच दिवशी याचिकेला भरघोस प्रतिसाद मिळाला. अवघ्या 24 तासात 15 हजारांपेक्षा जास्त नागपूरकरांनी यावर स्वाक्षरी केलीय.

महानगर पालिकेत सत्ताधारी व विरोधी पक्ष दोन्ही पक्षांनी मुंढेंविरोधात अभद्र युती केल्याचे दिसते. मुंढेंमुळे फाईली अडल्या, जनप्रतिनिधींना ते विश्वासात घेत नाहीत, नगरसेवकांना मान नाही अशा तक्रारी करत सर्वपक्षीय नगरसेवक मुंढेंविरोधात एकवटले.
महापौरांनीही पहिल्याच दिवसापासून आयुक्तांविरोधात प्रसारमाध्यमांत मोर्चा उघडला होता. विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे व सत्तारुढ पक्षाचे संदीप जाधव यांनी एकत्र येऊन पत्रपरिषद घेत मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचाही ईशारा दिला, कांग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी प्रतिबंधित क्षेत्रात जावून आयुक्तांविरोधात आंदोलन केले. याशिवाय सत्तारूढ काही आमदार व नगरसेवकांनी महापालिकेच्या रोगप्रतिरोधक कामात अडथळ्यांचाच पुरेपूर यत्न केला. महानगरपालिकेतील भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांमार्फत मुंढे यांच्याविरोधात पोलिस तक्रारी सुरु केल्या. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात, उर्जामंत्री नितीन राउत, कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार व सुनील केदार यांनी मुंढेंच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढवल्याच्या बातम्याही पुढे आल्या. तर या पार्श्वभूमीवर नागपूरकरांनीही मुंढे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेत हि मोहिम उघडली.

आयुक्त म्हणून जानेवारीत मुंढे महानगरपालिकेत रुजू झाले. कार्यभार सांभाळताच महापालिकेची विस्कटलेली घडी जागेवर आणण्याचे प्रयत्न सुरु केले. अधिकारी व कर्मचारी वर्गास शिस्तीत आणून महापालिकेच्या कार्य संस्कृृृतीत बदल घडवले. पावसाळ्याच्या तोंडावर नाग, पोहरा व पिवळी नद्यांच्या व शहरातील नाल्यांच्या साफसफाईचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला. हे सगळे करतांना पैशाचा काटेकोरपणे वापर करत या सर्व बाबींवर होणारा खर्च निम्म्यावर आणला.
अनावश्यक खर्च कमी करत पैशाची उधळपट्टी थांबवली. दरम्यान मार्चपासून कोरोनाचे थैमान आले. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला दिसतोय. मात्र मुंबई, पुणे, औरंगाबाद यांचे तुलनेत नागपूरची स्थिती आटोक्यात असल्याचे दिसते. नोडल ऑफिसर म्हणून तुकाराम मुंढे यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रभावीपणे काम केले.

सतरंजीपूरा परिसरात 70 वर्षीय इसमाच्या मृत्यूनंतर जवळपास 150 लोकांना कोरोना लागण झाली. अशांना हूडकून काढणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. भीती व गैरसमजूतीपोटी स्थानिक प्रशासनाला माहिती देत नव्हते. अनेक ठिकाणी सर्वेक्षणासाठी गेलेल्या पथकावर हल्ले झाले. अशा वेळी परिस्थिती हाताबाहेर जावू न देता मुंढे यांनी सतरंजीपू-यात रहाणा-या जवळपास 1700 नागरीकांना विलगीकरणात दाखल करण्याचा निर्णय घेतला. हीच परिस्थिती मोमिनपूरा वस्तीतही होती. याठिकाणी जवळपास 2000 विलिगीकरण कक्षात पाठवण्यात आले यातील 200 च्या आसपास व्यक्तींना कोरोनाबाधा झाली. विशेष म्हणजे दोन्ही अल्पसंख्यांक समाजाच्या वस्त्या म्हणून ओळखल्या जातात. रमझान सुरु असतांनाही या भागातून संशयितांना विलगीकरणात आणण्याचे धाडस मुंढेनी दाखवले.

मुंढेच्या पुढाकाराने कोरोनाबाधित वस्त्यांत दैनंदिन सर्वेक्षण, काॅन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, आयडेंटिफिकेशन व विलगीकरण या सा-याच बाबतीत उत्तम कामे सुरु आहेत. याशिवाय क्षयरोग, उच्च रक्तदाब, हदयविकार, मधुमेह व इतर आजार असलेल्यांची माहिती महानगरपालिकेने गोळा केली. अवघ्या दीड महिन्यात 25 लाख लोकांचे आरोग्य सर्वेक्षण महानगरपालिकेतर्फे करण्यात आले. या सर्व उपाययोजनांमुळे नागपूरात समुह संक्रमण वेळीच थांबवता आले. त्वरीत आयडेंटिफिकेशनमुळे मृृृृत्यूदरही कमी राखला शिवाय कोरोनामुक्तांची संख्याही वाढली. मुंढे यांनी निर्णय घेण्यात जी धडाडी दाखवली त्यामुळेच नागपूरची स्थिती आटोक्यात आल्याची भावना नागपूरकरांत आहे.

मुंढेंनी नागपूरात 5000 खाटांचे कोविड केयर सेंटर व शहरात 5 मोठी कोविड रुग्णालये उभारली. महापालिकेची आर्थिक स्थिती कमजोर असतांना नियोजनाने मुंढेंनी हे सारे करवून दाखवल्याचे नागपूरकरांचे म्हणणे आहे. नागपूरकरांनी जी ऑनलाईन पिटीशन सुरु केली आहे त्यात सविस्तरपणे हे मुद्दे मांडले आहेत. नागपूरच्या सुरक्षेसाठी मुंढे महानगरपालिकेत कायम हवे असा नागपूरकरांचा आग्रह आहे. व्यक्तिगत हित धोक्यात आल्याने सर्वपक्षीय मुंढेंविरोधात एकवटल्याचा आरोप या याचिकेत आहे. कोरोना महामारीच्या काळात नागपूर सुरक्षित रहावे यासाठी मुंढेंची नागपूरातून बदली करण्यात येऊ नये असे आवाहन नागपूरकरांनी या याचिकेनिमित्ताने केले आहे.

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Back to top button
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.