संदीप जोशी यांचा महापौरपदाचा राजीनामा?
नागपूर: भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपुरात सध्या राजकीय वातावरण जोरदार तापल्याचे चित्र आहे. भाजपमध्ये अंतर्गत वादाची परिणीती की काय भाजपचे नेते आणि महापौर संदीप जोशी यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यामुळेच भाजपमध्ये अंतर्गत कलह असल्याच्या चर्चांना उधान येत आहे.
नुकताच विधानपरिषद पदवीधर निवडणुकीत संदीप जोशी यांचा पराभव झाला. हा मतदारसंघ गेली कित्येक वर्ष भाजपच्याच ताब्यात होता. मात्र, यावेळी काँग्रेसने महाआघाडीच्या माध्यमातून बाजी मारली आणि भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात शह दिला. त्यामुळे संदीप जोशी नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर पासून ते शहराबाहेरच आहेत. त्यांचा पदभार उपमहापौर मनिषा कोठे यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे संदीप जोशी यांच्या महापौरपदाच्या राजीनाम्याच्या बातमी खरी की काय हिच चर्चा राजकीय वर्तुळात सर्वत्र सुरु आहे.
भाजप शहराध्यक्षांनी मात्र जोशी यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. दरम्यान पुढील महिन्यात संदीप जोशी यांचा पक्षाने निश्चित केलेला महापौरपदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे महापौर संदीप जोशी बाहेरगावी गेल्याचे म्हटले जात आहे. मात्र, विधानपरिषद पदवीधर निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते शहराबाहेर गेल्याने चर्चेने अधिक जोर धरला आहे. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी महापौरपदाचा मान त्यांचेकडे आला, तब्बल १३ महिने ते महापौर पदावर होते पैकी साडेसात महिने करोना कालावधीचे गेले, यादरम्यान आयुक्त मुंडे यांच्याशी बेबनावामुळे हा कालावधी चांगलाच गाजला