सोनेगांव तलावाचे सौंदर्यीकरण होणार
शहरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील भोसलेकालीन सोनेगांव तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम नागपूर महानगरपालिकेने आपल्या हाती घेतले आहेत. सोनेगांव तलावाचे प्रस्तावित सौंदर्यीकरण कामाचे सादरीकरण गुरुवारी (१८ मार्च) रोजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्यासमोर करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती श्री.प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते श्री. अविनाश ठाकरे उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनानी सोनेगांव तलावाच्या सौंदर्यीकरण करण्यासाठी रु. १७.३२ कोटीच्या प्रस्तावाला अगोदरच मंजूरी दिली आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेता श्री. देवेन्द्र फडणवीस यांच्या समोर याचे सादरीकरण करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
आर्किटेक्ट भिवगडे असोसिएटसचे प्रतिनिधी इंजीनिअर चेतन कावरे आणि आर्कि.राजेन्द्र माहुलकर यांनी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की सोनेगांव तलावाच्या सर्व बाजूने पदपाथ तयार केला जाईल तसेच काही ठिकाणी सुरक्षा भिंत सुध्दा बांधली जाईल. या तलावाचे सौंदर्यीकरणामुळे पर्यटनला चालना मिळेल. येथे येणा-या नागरिकांसाठी १५० दुचाकी वाहन आणि ४ चारचाकी वाहनांची मोठी पार्किंग उभारली जाईल. लहान मुलांसाठी खेळणी तसेच नागरिकांसाठी ग्रीन जिमची व्यवस्था केली जाईल.
येथे येणा-या पर्यटकांसाठी शौचालय व उद्यान व्यवस्था तसेच रोशनाई केली जाईल. काही ठिकाणी दगडी भिंती चे दुरुस्तीचे काम करणे प्रस्तावित आहे. या ठिकाणी नाश्त्याचे स्टॉल सुध्दा राहतील. या हेरीटेज तलावाला त्यावेळेचा “लुक” देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी मुख्य अभियंता श्रीमती लीना बुधे, अधीक्षक अभियंता श्री. अजय पोहेकर, श्री. सुनील शर्मा आदी उपस्थित होते.