पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या खांद्यावरील सन्मानचिन्हे उलगडतात त्यांच्या पदाची ओळख!
आर्मी आणि पोलीस यांच्यातील महत्त्वाचा फरक आढळून येतो त्यांच्या युनीफॉर्म मध्ये! आम्ही यापूर्वी तुम्हाला आर्मी अधिकाऱ्यांच्या युनीफॉर्मवर असणाऱ्या सन्मानचिन्हांचा अर्थ सांगितला आहे.
सैन्यातील अधिकाऱ्यांचे रँक दडलेले असतात त्यांच्या खांद्यावरील सन्मानचिन्हांमध्ये!
आज जाणून घेऊया पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या युनीफॉर्मवर असणाऱ्या सन्मानचिन्हांचा अर्थ! आर्मी मधील अधिकाऱ्यांप्रमाणे पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या युनीफॉर्म वर त्यांच्या हुद्द्यानुसार सन्मानचिन्हे प्रदान केली जातात. पण त्यांचा अर्थ माहित नसल्याने बहुतेक वेळा आपल्याला ठराविक पोलीस अधिकारी कोणत्या पदावर आहे हे समजण्यात गोंधळ उडतो. आज हाच गोंधळ दूर करून घेऊ.
पोलीस खात्यामध्ये खालील प्रमाणे दोन श्रेण्या असतात.
१) गॅझेटेड ऑफिसर्स
या श्रेणीमध्ये ऑल इंडियन पोलीस सर्विस (IPS) अधिकाऱ्यांचा समावेश होतो. जे कॅडरचे क्लास वन मधील अधिकारी म्हणून ओळखले जातात. तसेच या श्रेणीमध्ये स्टेट पोलीस सर्विसच्या इन्स्पेक्टर रँकपेक्षा वरच्या पदावरील अधिकाऱ्यांचा देखील समावेश होतो. जे क्लास टू गॅझेटेड ऑफिसर्स म्हणून ओळखले जातात.
२) नॉन-गॅझेटेड ऑफिसर्स
या श्रेणीमध्ये उर्वरित सर्व पोलीस खात्याचा समावेश होतो.
गॅझेटेड ऑफिसर्स
इंडियन पोलीस सर्विस (IPS)
IPS हा बॅच प्रत्येक IPS अधिकाऱ्याच्या खांद्यावर प्रदान केला जातो.
डायरेक्टर ऑफ इंटेलीजन्स ब्युरो (DBI, भारत सरकार).
डायरेक्टर ऑफ इंटेलीजन्स ब्युरो पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये सर्वात वर अशोकस्तंभ असतो. त्या खालोखाल एक स्टार, त्या नंतर क्रॉस असलेली तलवार-दंडुका आणि सगळ्यात शेवटी IPS चा बॅच असतो.
कमिशनर ऑफ पोलीस किंवा डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (CP किंवा DGP, राज्य).
कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये सर्वात वर अशोकस्तंभ, त्या नंतर क्रॉस असलेली तलवार-दंडुका आणि सगळ्यात शेवटी IPS चा बॅच असतो.
जॉइंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (JCP किंवा IGP).
जॉइंट कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये सर्वात वर एक स्टार, त्या नंतर क्रॉस असलेली तलवार-दंडुका आणि सगळ्यात शेवटी IPS चा बॅच असतो.
अॅडीशनल कमिशनर ऑफ पोलीस किंवा डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस.
(ADL.CP किंवा DIG)’अॅडीशनल कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये सर्वात वर अशोकस्तंभ, त्या नंतर त्रिकोणावस्थेत असलेले तीन स्टार आणि सगळ्यात शेवटी IPS चा बॅच असतो.
डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस (सिलेक्शन ग्रेड) किंवा सिनियर सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (DCP किंवा SSP).
डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये सर्वात वर अशोकस्तंभ, त्या खाली एक स्टार आणि सगळ्यात शेवटी IPS चा बॅच असतो.
अॅडीशनल डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस किंवा अॅडीशनल सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (ADL.DCP किंवा ASP).
अॅडीशनल डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये अशोकस्तंभ आणि IPS चा बॅच असतो.
असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा डेप्युटी सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (ACP किंवा DSP)
असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये तीन स्टार आणि IPS चा बॅच असतो.
असिस्टंट सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (प्रोबेशनरी रँक : २ वर्षांचा अनुभव) (ASST.SP)
असिस्टंट सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (प्रोबेशनरी रँक : २ वर्षांचा अनुभव) पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये दोन स्टार आणि IPS चा बॅच असतो.
असिस्टंट सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (प्रोबेशनरी रँक : १ वर्षाचा अनुभव) (ASST.SP).
असिस्टंट सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (प्रोबेशनरी रँक : १ वर्षाचा अनुभव) पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये एक स्टार आणि IPS चा बॅच असतो.
स्टेट पोलीस सर्विस
डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस (सिलेक्शन ग्रेड) किंवा सिनियर सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (DCP किंवा SSP).
डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस (सिलेक्शन ग्रेड) पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये सर्वात वर अशोकस्तंभ आणि त्या खाली दोन स्टार असतात.
डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस किंवा सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस ( DCP किंवा SP).
डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये सर्वात वर अशोकस्तंभ आणि त्या खाली एक स्टार असतो.
अॅडीशनल डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस किंवा अॅडीशनल सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (ADL.DCP किंवा ASP)
अॅडीशनल डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये केवळ अशोकस्तंभ असतो.
असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा डेप्युटी सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (ACP or DSP)
असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये तीन स्टार असतात.
नॉन-गॅझेटेड ऑफिसर्स
इंडियन स्टेट पोलीस
इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (INS).
इन्स्पेक्टर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये तीन स्टार आणि त्या खाली लाल आणि निळ्या रंगाच्या पट्ट्या असतात.
असिस्टंट इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (API).
असिस्टंट इन्स्पेक्टर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये तीन स्टार आणि त्या खाली लाल रंगाची पट्टी असते.
सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (SI).
सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये दोन स्टार आणि त्या खाली लाल आणि निळ्या रंगाच्या पट्ट्या असतात.
असिस्टंट सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (ASI).
असिस्टंट सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये एक स्टार आणि त्या खाली लाल आणि निळ्या रंगाच्या पट्ट्या असतात.
पोलीस हेड कॉन्स्टेबल (HPC).
पोलीस हेड कॉन्स्टेबल पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये उलट्या व्ही आकारातील लाल रंगाचे तीन बाण खालच्या दिशेने असलेले आढळतात किंवा नेव्ही ब्ल्यू रंगाची इफॉलेटस् आढळते, ज्यावर तीन सोनेरी रंगाच्या पट्ट्या असतात.
सिनियर पोलीस कॉन्स्टेबल (SPC).
सिनियर पोलीस कॉन्स्टेबल पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये उलट्या व्ही आकारातील लाल रंगाचे दोन बाण खालच्या दिशेने असलेले आढळतात किंवा नेव्ही ब्ल्यू रंगाची इफॉलेटस् आढळते, ज्यावर दोन सोनेरी रंगाच्या पट्ट्या असतात.
पोलीस कॉन्स्टेबल (PC).
पोलीस कॉन्स्टेबल पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर कोणत्याही प्रकाराचे सन्मानचिन्ह नसते. त्यांच्या अंगावर केवळ खाकी युनीफॉर्म असतो.