नागपुरात G-20 बैठकीसाठी लावलेले झाड चोरीला, व्हिडिओ viral
20-23 मार्च रोजी नागपुरात G-20 कार्यक्रम होणार असून, त्यासाठी संपूर्ण शहर सजवले जात आहे. शहरात ठिकठिकाणी झाडे लावली जात आहेत. अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन चोर G20 कार्यक्रमासाठी लावलेली रोपे चोरत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये चंदेरी रंगाच्या बीएमडब्ल्यू कारमधील दोन पुरुष फ्लायओव्हरखाली थांबल्याचे दिसत आहे. जिथे डिव्हायडरच्या जागेवर रोपे लावली आहेत. दोघेजण दुभाजकावरील रोप उचलताना दिसत आहेत. त्यापैकी एकाने टोपी घातली आहे. दोघेही रस्त्याच्या पलीकडे धावत जातात आणि तिथून रोपटे उचलून त्यांच्या गाडीच्या डिकीत ठेवतात. झाड चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कारची नंबर प्लेट स्पष्टपणे दिसत आहे.
G-20 ची महत्त्वपूर्ण बैठक नागपुरात होणार आहे. ज्याची गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे. त्यासाठी राज्यभर सजवण्यात येत आहे. पाहुण्यांचे शाही पद्धतीने स्वागत करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. 20 ते 23 मार्च दरम्यान नागपुरात ही बैठक होणार आहे.