तुकाराम मुंढे यांची अचानकपणे मुंबई येथे बदली

नागपूर:- शिस्तप्रिय कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची अचानकपणे सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या रिक्त पदावर मुंबई येथे बदली करण्यात आलेली आहे. या संबंधितचे बदली आदेश पत्रकाची प्रत एव्हाना सर्वत्र व्हायरल झालेली आहे. व्हाट्सअप वर व्हायरल होत असलेली या प्रतीची शहानिशा केल्या जात आहे. त्यांना राधाकृष्णन बी. यांचेकडे पदाचा प्रभार सोपविण्याचे सदर आदेशात अंकित आहे
नागपूर महानगरपालिकेत सत्ता पक्षासह सतत होत असलेल्या संघर्षांमुळे मुंढे नेहमीच नागरिकांच्या चर्चेचा विषय होते तर नुकतेच कोरोना काळातील उपाय योजना संदर्भात न्यायालयाने प्रशासनाच्या कामकाजांत सुधारणा विषयीचे मुंढेना निर्देश दिले होते त्यातच
काल मुंढे स्वत: कोरोना अहवालात पॉझिटिव असल्याचे निष्पन्न झाले होते व पुढील 14 दिवस होम काॅरंटाइन राहून आपले कार्य करण्यावर त्यांनी भर दिला होता. याच पार्श्वभूमीवर आता बदली मुळे त्यांचे पुढचे पाऊल काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे