मनसे च्या पाठपुराव्याने एसटी सेवा पुर्ववत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व मनविसेचे अध्यक्ष मा.आदित्यसाहेब शिरोडकर, मनसेचे प्रदेश सरचिटनिस मा.हेमंतभाऊ गडकरी, मनविसे जिल्हा अध्यक्ष मा.दिनेशभाऊ ईलमे यांच्या मार्गदर्शनाने व मनविसे मौदा तालुका अध्यक्ष मा.मृणाल संजय तिघरे यांच्या पुढाकाराने मौदा तालुक्यातील नानादेवी,किरणापूर,कोपरा,कुंभापूर,मांगली(चांदे) या गावांमधील १५ वर्षापासुन बंद असलेली एस.टी.महामंडळची बस सेवा आज सुरु झाली.
मौदा तालुक्यातील या गावांमध्ये एस.टीची बस सेवा सुरु करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातुन गेल्या दोन वर्षापासुन निवेदने दिली गेली होती व त्याचा सतत पाठपुरावा केला होता आणि त्याच निवेदनांची दखल घेत आता ही बस सेवा सुरु झाली आहे त्याबद्दल सर्व गावकर्यांनी व विद्यार्थ्यांनी मनसे चे आभार मानले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेक युवकांनी मनसे मध्ये प्रवेश केला व येत्या काही दिवसात तालुक्यात आणखी भव्य पक्ष प्रवेश बघायला मिळणार आहे.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले मनविसे चे जिल्हा अध्यक्ष दिनेश ईलमे, मनविसे मौदा तालुका अध्यक्ष मृणाल तिघरे, मनविसे उत्तर नागपूर विभाग अध्यक्ष मनोज कहालकर, महाराष्ट्र सैनिक निलेश लांडगे, सोनु शेंडे, पंकज मेश्राम, हर्षल खेडेकर, शुभम शेंडे, धीरज नागमोते, रामचंद्र शेंडे, सूरज नागमोते, छगन वडे, राहुल ढोबळे, आकाश करारे, कुणाल वडे, नागेश करारे, गायत्री गाढवे, शुभांगी परतेती, भाग्यश्री खेडकर व आदी गावकरी व महाराष्ट्र सैनिक मोठया संख्येत उपस्थित होते.